बीड जिल्हाबीड तालुकाब्रेकिंग न्युजभ्रष्टाचार विषयकलिंबागणेश सर्कल

लिंबागणेश ग्रामपंचायतच्या पथदिव्याखाली ५ लाखांचा भ्रष्टाचार , गावाबरोबर गणपती मंदिर सुद्धा अंधारात―डॉ.गणेश ढवळे

लिंबागणेश:आठवडा विशेष टीम― बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथिल ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ५ लाख ४९ हजार ५०० रुपये निधि घशात घालून संपूर्ण गावासह सुप्रसिद्ध भालचंद्र गणपती मंदिर सुद्धा अंधारात आहे, इतका निधी उचलुन गावासह गणपती मंदिर अंधारात असल्यामुळे ग्राभस्थांच्या भावना दुखावल्या असुन संबंधित प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना ई-मेल द्वारे पाठवले आहे.

सुंदरभाऊ वाणी :- व्यवस्थापक भालचंद्र गणपती मंदिर

भालचंद्र गणपती मंदिराच्या गाभाऱ्यातील लाईट चालू असुन केवळ एका पथदिव्यावरील दिवा चालू स्थितीत आहे, मंदिराच्या आवारात ५ सौरदिवे लावलेले असुन सध्या एकही चालु अवस्थेंत नाही, ६ महीन्यापासून सौरदिवे बंद आहेत.ग्रांमपंचायतीला सांगून दमुन गेलो. फरक पडत नाही.

सुंदरराव जाधव :वस्तीवरील ग्रामस्थ

जाधव वस्तीवर सौरदिवे लावलेले आहेत पण ते बंद अवस्थेत असुन अमावस्या पुर्णिमेला चालले तर १० मिनिटांच्यावर चालत नाहीत.याविषयी ग्रांमपंचायतला दहा वेळा सांगून झाले ,त्यांना काही फरकच पडत नाही.

डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर :

लिंबागणेश ग्रांमपंचायतने १४ व्या.वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१६-१७ दीड लाख रुपये , सन २०१७-१८ दीड लाख रुपये ,सन २०१८-१९ दीड लाख रुपये आणि सन २०१९-२० साली ९० हजार ५०० रुपये असा एकूण ५ लाख ४९ हजार ५०० रू.निधि उचलण्यात आला आहे. परंतु ९० टक्के सौरदिवे बंद आहेत. गावात सध्या एकुण २५ पथदिवे चालु अवस्थेत आहेत.परंतु राज्यमार्ग ५६ मांजरसुंभा ते पाटोदा बसस्थानक समोर , मुख्य चौक , मारोती मंदिरासमोर , कानिटकर वाड्यासमोर , आणि विशेष म्हणजे कैकाडी वस्ती , थोरात वस्ती याठीकाणी केवळ दोन तर निर्मळ वस्ती मध्ये ३ पथदिवे सुरू आहेत.

सुप्रसिद्ध भालचंद्र गणपती मंदिराच्या आवारात केवळ एक पथदिवा चालू असुन ५ सौरदिवे बंद अवस्थेत असुन केवळ शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.
ग्रांमप़चायतने ५ लाख ४९ हजार ५०० रु.निधी उचलून सूद्धा गावासह गणपती मंदिर अंधारात असल्यामुळे बहुतांश ठिकाणी ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर स्वत: दिवे लावले आहेत, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, अध्यक्ष जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड, विभागीय आयुक्त यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.