परळी:आठवडा विशेष टीम― भारत सरकारच्या मार्फत सर्व राज्यातही एक देश एक रेशन कार्ड योजना 1 जून 2020 पासून संपूर्ण देशात योजना लागू करण्यात आली दि 11 /12 /2019 ला ना छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एक देश एक रेशन कार्ड योजना महाराष्ट्रात लागू करण्यासंदर्भात काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती महाराष्ट्रात 1 जून 2020 महाराष्ट्र योजना लागू करण्यात आली आहे याचा फायदा गोरगरीब जनता कामगार ऊसतोड मजूर इत्यादींना मोठ्या प्रमाणावर होणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे रेशन कार्डवर देशातल्या कोणत्याही नागरिकाला याचा फायदा होईल कारण बायोमेट्रिक व आधार लिंक मुळे अन्नधान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडून मिळण्यास अडचण येणार नाही सामान्य जनतेला या योजनेचा महा विकास आघाडी सरकारकडून फार मोठ्या प्रमाणावर आधार मिळणार आहे या योजनेचा जनतेनी फायदा घेण्याचे आव्हान काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांनी केले आहे स्वस्त धान्य दुकानदार व अधिकारी संगनमताने भ्रष्टाचार करीत होते एक देश एक देश एक रेशन कार्ड योजना मुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल हा खरा शासनाचा हेतू असून सर्वसामान्य जनतेला आपत्कालीन परिस्थिती कोरना सारखे महामारी दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक संकटे मध्ये या योजनेचा जनतेला फायदा होईल कारण देशांमध्ये ही योजना राबवण्यात संदर्भात सर्व यंत्रणा कार्यरत झालेली आहे करिता काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्रात ही योजना राबविण्यास संदर्भात मुख्य सचिव यांच्याकडे दिनांक 11 /12/ 2019 ला निवेदनाद्वारे विनंती केली होती कारण या योजनेअंतर्गत गोरगरीब सामान्य जनतेला स्वस्त धान्य उपलब्ध होईल काळाबाजारला आळा बसेल अधिकारी व दुकानदार संगनमताने खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करित होते एक देश एक रेशन कार्ड आधार लिंक केल्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल स्वस्त धान्य दुकानदाराकडे ई पाॅस मशीन असणे गरजेचे आहे अंगठा लींक केल्याशिवाय मशीनवर ठेवून कागदपत्रे तपासून धान्य वितरण करण्याची व्यवस्था या योजनेमध्ये आहे त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल व सामान्य माणसाला धान्य मिळेल अशी या योजनेचा खरा हेतुआहे 1जुन 2020 संपूर्ण देशात राज्यामध्ये योजना लाभ होणार आहे करिता शासन स्तरावर या योजनेसंदर्भात लागू करण्यासाठी सर्व तयारी चालू आहे दुर्गम भागात नेटवर्क उपलब्ध नसेल तर ऑफलाइन धान्य देण्याची परवानगी दिली जाईल तसेच ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे धान्य दिले गेले नाही त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचा शब्द शासनामार्फत देण्यात आले त्यामुळे आधार लिंक झाल्यामुळे सामान्य जनतेला अन्नधान्य स्वस्त धान्य दुकान वरून मिळण्यास अडचण येणार नाही रेशन कार्ड आधार लिंक तात्काळ जोडून या योजनेचा हेतू साध्य करण्याचा महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे असे माहिती काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी दिली आहे.