परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम―
लोकनेते स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी घालुन दिलेल्या शिकवणीच्या प्रेरणेवर आयुष्याची वाटचाल सुरु असुन लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम समाज निर्मितीचे कार्य सुरु असल्याचे भाजपायुमोचे युवा नेते निळकंठ चाटे यांनी व्यक्त केले.
लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यस्मरणानिमीत्त निळकंठ चाटे यांनी आज दि.3 जुन रोजी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी आपल्या नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या कार्यामुळे लोकनेते स्व गोपीनाथराव मुंडे यांच्या सामाजीक कार्याची व संघर्षाची ज्योत कायम असुन समाजातील रंजल्या-गांजल्या घटकांसाठी त्यांचे कार्य आम्हासाठी मार्गदर्शक आहे.लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आपल्या आयुष्यात ऊसतोड मजुर,दीन दुबळ्यासासाठी कसलीही तडजोड न करता संघर्ष केला राजकिय,सामाजीक क्षेत्रात कार्य करण्याची शिकवण ही माझ्यासाठी आयुष्याची शिदोरी असुन त्यांच्या या प्रेरणेने माझी वाटचाल सुरु असुन भविष्यात काम करताना स्व.मुंडे साहेबांची शिकवण ही हीच माझी उपलब्धी असल्याचे भाजपायुमोचे युवा नेते निळकंठ चाटे यांनी सांगितले.