बीड जिल्हासामाजिक

खा डॉ प्रितमताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त पशुपक्षांसाठी पाणवठे अँड सर्जेराव तात्या तांदळे यांचा स्तुत्य उपक्रम

रायमोहा (प्रतिनिधी): यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये १९७२ पेक्षाही भयानक दुष्काळजन्य स्थितीती आहे याचे भान ठेवून मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांचा १७ फेब्रवारी रोजी वाढदिवस असल्याने याचे औचित्य साधून बीड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी बीड जिल्हासरचिटणीस अँड सर्जेराव तांदळे यांनी वन्य प्राणी असलेल्या हरिण ,मोर ,ससा व इतर प्राण्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती लक्ष्यात घेऊन व आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड तालुक्यातील तिप्पटवाडी मातोश्री माध्यामिक विद्यालय वंजारवाडी नायगाव मयुर येथे शिवसृष्टी येथे पाणवठे उभारून प्राण्यांच्या पाण्याची सोय करून बीड जिल्ह्यातील इतर पुढा-यांना आदर्श घालून दिला आहे त्याप्रसंगी बीड नगरीचे माजी उपनगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी बीड जिल्हासरचिटणीस अँड सर्जेराव तांदळे सुग्रीव मामा तांदळे भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे बीड जिल्हाउपाध्यक्ष गोकुळ सानप, सचिन तिप्पटे, अमर सानप ,विशाल खाडे, हानुमंत शेंडगे, पप्पु काळे, अर्जून शेंडगे, विश्वनाथ नागरगोजे ,बाजीराव वाघमारे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.