औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात पावूस ,ढगाळ वातावरणात सरींवर सरी

सोयगाव,दि.३:आठवडा विशेष टीम―
सोयगावसह तालुक्यातील चारही महसुली मंडळात बुधवारी पावसाच्या सरींवर सरी कोसळल्याने रोहिणी नक्षत्राच्या पावसाचे आगमन झाले आहे.रोहिणी नक्षत्राचा पावूस जरी कोसळला असला तरी मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोयगाव तालुक्यात बुधवार पहाटेपासून पावसाने सरींवर सरी पडल्याने सोयगाव तालुक्यात गारठा वाढला होता,पावूस पडताच मात्र शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले असल्याचे आढळून आल्याने खरिपाच्या आंतर मशागतीच्या कामांनी वेग घेतला होता.सोयगाव,जरंडी,बनोटी आणि सावळदबारा या चारही मंडळात पावसाने हजेरी लावली.त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे सोयगाव तालुक्यात दिवसभर सूर्यदर्शन झाले नव्हते.

आजपासून धूळपेरण्यांची शक्यता-

हंगामीपूर्व कपाशी लागवडीच्या कामांनी सोयगाव तालुक्यात वेग घेतला असतांना,मात्र बुधवारी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गुरुवार पासून सोयगाव तालुक्यात धूळ पेरण्यांच्या कामांची लगभग हाती घेण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

४३ हजार हेक्टरवर खरिपाच्या होणार पेरण्या-

सोयगाव तालुक्यात ४३ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होणार असून शेतकऱ्यांची पेरण्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.