एका व्हाट्सआप मॅसेजची मुख्यमंत्र्यांकडून तात्काळ दखल ;अंध-दिव्यांग कोरोना रुग्णाची ससेहोलपट थांबली

वसई:आठवडा विशेष टीम―सद्या कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.अशात पॉसिटीव्ह रुग्णाला लक्षणं असताना 10 दिवसातही ऍडमिट न करणे धक्कादायक आहे, मात्र हे वास्तव कळल्यावर एका मॅसेजची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवघ्या काही तासातच रुग्णाला ऍडमिट करून उपचार सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे. याबाबत पत्रकार अलका धुपकर यांनी एक व्हायरल व्हाट्सआप श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांना पाठवला होता, या नंतर पंडित यांनी वस्तुस्थिती पडताळून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संपर्क साधला होता, मुख्यमंत्री ठाकरे यांनी काही मिनिटातच प्रतिसाद देत त्या रुग्णाला दाखल करून उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. या तत्परतेबाबत पंडित समाधान व्यक्त यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.अनुजा संखे-घोडके आणि हर्षद जाधव यांच्या नावाने आपल्या एका दिव्यांग मित्राची व्यथा मांडणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या अंध दिव्यांग व्यक्तीला 17 मे रोजी कोरोना सदृश लक्षणे होती, याबाबत त्याने प्रथम एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली, वारंवार सांगूनही डॉक्टरांनी त्याचे काहीही न ऐकता सर्दी खोकल्याची औषधें देत परत पाठवले, मित्रांनी कोविड हेल्पलाईनला संपर्क करून त्याची कोरोना टेस्ट व्हावी म्हणून विनंती केली होती, अथक प्रयत्नांनी या हेल्पलाईनवर संपर्क झाल्याचे या मित्रांनी पोस्ट मध्ये सांगितले आहे, माहिती दिल्यानंतरही 2 दिवस टेस्ट झाली नाही, त्यानंतर टेस्ट झाल्यावर ती पॉसिटीव्ह आल्यानंतरही त्याला ऍडमिट करायला रुग्णवाहिका यायला 24 तास उलटले, दरम्यान त्याचे पूर्ण कुटुंबीय त्याच्यासोबत बराच काळ संपर्कात आले. रुग्णवाहिका आल्यानंतरही तिची विदारक स्थिती आणि त्याला दाखल केलेल्या सरकारने ताब्यात घेतलेल्या खाजगी हॉस्पिटलकडून त्याला पुन्हा खर्चाचे कारण देत सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठविताना आलेला थरारक अनुभव या पोस्ट मध्ये होता. अन्न, पाणी, मदत आणि उपचारविना असलेल्या या असह्य मित्रासाठी दोन मित्रांनी केलेला हा फेसबुक मॅसेज व्हाट्सआपच्या माध्यमातून पत्रकार अलका धुपकर यांनी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांना पाठवला.विवेक पंडित यांनी हा मॅसेज मिळताच प्रथम पोस्ट टाकणारे आणि स्वतः रुग्णांशी बोलणे केले, याबाबतच्या वस्तुस्थितीची खात्री केली. त्यानंतर याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच संबंधित अधिकारी, महापालिका आयुक्त यांना याबाबत माहिती दिली, मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची दखल घेत, त्यांचे विशेष कार्य अधिकारी सुधीर नाईक यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू केला, याबाबत काही तासातच या रुग्णाला वसईतील गोल्डन पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.एकूणच या पूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः दाखवलेले तत्परता उल्लेखनीय आहे. अशी कोणतीही अडचण अथवा आपत्कालीन स्थिती असल्यास मला थेट संपर्क करावा मी स्वतः लक्ष घालेन असेही मुख्यमंत्र्यांनी विवेक पंडित यांना सांगितले. पंडित यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मनःपूर्वक आभार मानले.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.