सोलापूर:आठवडा विशेष टीम― पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कंटेन्मेंट झेान नीलम नगर येथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांच्या आरोग्याची विचारपूस केली.
तसेच त्या भागात कोविड सर्व्हे झाला आहे का, सर्व्हे मध्ये काय-काय विचारण्यात आले होते, तपासणी केली का याची विचारपूस केली. शासनाकडून कोणती अडचण आहे का हे जाणून घेतले. नागरिकांनी वृद्ध माणसांची आणि लहान मुलांची काळजी घ्या, कोरोनाला घाबरु नका, कोरोनाशी आपण लढू शकतो आणि हारवू या असा संवाद साधला.
नीलम नगर येथील स्थानिक डॉक्टर व नगरसेवक यांच्याशी चर्चा केली. नागरिकांशी संवाद साधत असताना शासकीय नियमाचे पालन करावे, तसेच आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन पालकमंत्री श्री.भरणे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी. शिवशंकर होते.