परळी:आठवडा विशेष टीम―दरवषी प्रमाणे याही वर्षी परळी शहरामधील मोठ्या नाल्यांची साफ-सफाई चे काम ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सूचनेनुसार व मा.वाल्मिक अण्णा कराड तसेच मा.मुख्याधिकारी अरविंद मुंडे न.प. परळी यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात नैसर्गिक व्यवस्थापनांतर्गत मान्सून पूर्व मोठ्या नाल्यांची साफ – सफाई करण्यास दि.०३ जून रोजी सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला भीमनगर, उखळवेस, खाडीनाला, आझाद नगर, पेठ मोहोल्ला, डॉ.खान साहेब यांच्या घरामागील मोठी नाली येथून या कामास सुरुवात करण्यात आली. लवकरच शहरातील सर्व मोठ्या नाल्या ज्याने करून शहरात मोठी अतिवृष्टी झाली तरीही या नाल्यामधून पावसाचे पाणी सुरळीतपणे जाईल जेणे करून लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत नगर परिषदेच्या स्वच्छता विभागांतर्गत किशोर पारधे स्वच्छता निरीक्षक श्रावण घाटे, कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे, स्वच्छता निरीक्षक शंकर साळवे यांच्या देखरेखीत शहरातील मोठ्या नाल्यांच्या साफ सफाई च्या कामाला सुरुवात करण्यात आली.