सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगावसह तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे गुरुवार पासून सोयगाव तालुक्यात कोरडवाहू कपाशीच्या लागवडीच्या कामांनी वेग घेतला आहे.
मात्र पहिल्याच दिवशी मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांची पंचायत झाली होती.त्यामुळे अखेरीस जास्तीचा रोजगार देवून कपाशी लागवडीच्या कामांना आटोपते घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला होता.
सोयगावसह तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या दमदार रोहिनी नक्षत्राच्या पावसाने शेतकऱ्यांची झोप उडवून दिली आहे.सोयगाव तालुक्यात अद्याप काही भागात खरीपपूर्व मशागतीच्या कामे अडखळली आहे.मात्र झालेल्या पावसाने शेतकयांच्या मशागतीला वेग आणला असून गुरुवारी काही भागात खरीप पूर्व मशागत तर काही भागात कोरडवाहू कपाशीच्या लागवडीच्या कामांची धावपळ उडाली होती.या आधीच हंगामी पूर्व कपाशीच्या पिकांची लागवड करण्यात आली आहे.याबाबतचा हेक्टर वरील आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नसून मात्र गुरुवारी खरिपाच्या कपाशी लागवडीसाठी मजुरांची टंचाई निर्माण झाली होती,त्यामुळे मशागत होवूनही कपाशी लागवड मजुरांच्या अभावी खोळंबली होती.
जिल्हाबंदीमुळे अडचण वाढली-
कोरोना संसर्गाच्या जिल्हाबंदीच्या निर्णयामुळे शेजारील तालुक्यातील मजूर वाहनाद्वारे आणण्याची चिंता झाल्याने सोयगाव तालुक्यातील मजुरांच्या टंचाईमुळे अनेक शेतकयांच्या पेरण्या खोळंबा झाला होता.