परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजसामाजिक

प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतील आनंदधाम (आनंदराई) येथे लॉक डाऊनच्या काळात झाले १२०० झाडांचे संवर्धन

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीत ग्रामीण पोलीस स्टेशन लगत असलेल्या आनंदधाम (आनंदराई) येथील पाच एकर जागेच्या क्षेत्रात परळी नगरीतील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांनी एकत्रित येवून वृक्ष लागवड संवर्धन चळवळीच्या माध्यमातून मोठया प्रमाणात शुध्द हवा(अॉक्सीजन) देणा-या 1200 वृक्षांचे संगोपन करून संवर्धन केले आहे.

प्रदूषण ग्रस्त परळी व परीसरात निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी लागवड करण्यात आलेल्या 1200 झाडांसाठी टँकरद्वारे पाण्याचे नियोजन जलदात्यांच्या अनमोल योगदानातून करण्यात आले तसेच कोरोनाच्या काळातील लॉक डाऊन मध्ये प्रखर उन्हाळयातील उष्णतेमुळे होरपळणा-या वृक्षांसाठी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत श्रमदान करून झाडांना पाणी देऊन सर्व वृक्षांची काळजी वृक्ष लागवड-संवर्धन चळवळीच्या सर्व वृक्षमित्रां मार्फत घेण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या वने व पर्यावरण विभागाच्या माध्यमातून प्रसिध्द सिने अभिनेते श्री.सयाजी शिंदे,नामवंत लेखक श्री.अरविंद जगताप यांच्या प्रमुख उपस्थित शालेय विद्यार्थी व वृक्षप्रेमी नागरिकांच्या हस्ते आनंदधाम अर्थातच आनंदराईच्या पाच एकर क्षेत्रात वड,पिंपळ,कडूनिंब,करंज,चिंच,शिसू,आपटा,उंबर अशाप्रकारची 1200 झाडांची लागवड करून संवर्धन करण्यात येत आहे.
तसेच वन व सामाजिक वनीकरण विभागाद्वारे डेन्स फॉरेस्टची निर्मिती परळी रेल्वे स्टेशन परीसर,कन्हेरवाडी,वसंतनगर तांडा नंदागौळ रोड,रेवली,मालेवाडी येथे करण्यात आली आहे.
वृक्षमित्र,जलदात्यांसहीत सामाजिक वनीकरण मुख्य संरक्षक नितीनजी गुदगे (औ‘बाद), विभागिय जिल्हा सामाजिक वनीकरण अधिकारी अमोल सातपुते (बीड),विभागिय जिल्हा वनाधिकारी मधुकर तेलंग,उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक,तहसीलदार डॉ.विपीन पाटील,न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परळी तालुका सामाजिक वनीकरण अधिकारी श्री.भगवान गित्ते,वनाधिकारी आर.बी. शिंदे,पाणी पुरवठा सभापती भावडया कराड,वनपाल श्री.जाधवर,श्री.कस्तुरे,वन रक्षक श्री.दौंड यांच्यासह चेतन सौंदळे,अनंत इंगळे,योगेश पांडकर,कृष्णा मिरगे,अॅड.अरूण पाठक,भैय्या चांडक,मकरंद नरवणे,अतुल खके,दीपक कापसे,बाळूशेठ शंकुरवार,सोमनाथ निलंगे,शिरीष सलगरे,रमेश वाघमारे,रमणीक पटेल,अशोक मुंडे,विशाल नरवणे,श्रीकांत खोत,राजू गडेकर,कृष्णा पाखरे,नंदकिशोर कोरे,अॅड.रमेश साखरे,गोविंद शेटे,जगदीश मिटकर,बालाजी चीडबुकेअप्पा,श्री.पुजारी,राम पेंटेवार,मनोहर कराड,प्रा.सदानंद लोखंडे,श्रीकांत पाथरकर,शंकर कापसे,प्रल्हाद सुरवसे,जयराम गोंडे,वैजनाथ कळसकर,गोपाळ व्यास,सुशील मुंदडा,डॉ.राहुल देशमुख,दिनेश लोंढे,राजेश पवार,दिपक आंधळे,सचिन मुंदडा,शरद पाटसकर,मनोज मानधणे,सुशील येलाळे,अनिरूध्द जोशी,सेवकराम जाधव,स्वानंद पाटील,प्रमोद भालेराव,संजय वानखेडे,शिवाजी चाटे,योगेश पाटील सह कर्मचारी वृंद परीश्रम घेत आहेत.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  हवी असेल जर पर्जन्यवृष्टी
  तर सजवा वृक्षांची सृष्टी

  5 जून जागतिक पर्यावरण दिन

  प्रदूषणग्रस्त परळी व परीसरात व्यापक प्रमाणात वृक्ष लागवड-संवर्धन करणे गरजेचे आहे.वृक्ष लागवड-संवर्धन चळवळ परळीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून वृक्षांचे संगोपन केले जात आहे. विविध पक्ष्यांची रेलचेल, किलबिलाट तसेच कावळे-चिमण्यांची झाडांवरील शाळा व वन्य प्राण्यांची पर्यावरणपुरक वाढ आवश्यक आहे.
  –चेतन सौंदळे
  वृक्षमित्र,परळी-वैजनाथ


  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.