पाटोदा:नानासाहेब डिडुळ―राज्यात कोविड-19 विषाणूच्या महामारीमुळे मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले आहेत, यामुळे व्यापारी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. काही प्रमाणात यामधील कामगार आणि शेतमजूर यांना राशन च्या माध्यमातून धान्याची मदत शासनाकडून झालेले आहे.परंतु गहू तांदूळ डाळ मिळाली म्हणजे घर चालेते असे नाही, या सोबत किराणा,भाजीपाला, दुध, दवाखाना, किंवा इतर खर्च अनिवार्य आहे.
राज्यातील छोटे-मोठे सर्वच रोजगाराचे साधन बंद पडल्याने नागरिकांच्या घरात किंवा हातात एक रुपया सुद्धा बाकी नाही. अशा परिस्थितीत विद्युत बिल,नागरिकांना आज न उद्या भरावेच लागणार आहेत. परंतु आणिखी काही महिने या आर्थिक अडचणीतून सामान्य नागरिकांना सावरणे फारच कठीण आहे. यासाठी थोडी का होईना मदत म्हणून राज्यातील नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे, ही अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आष्टी पाटोदा शिरूर चे नेते नामदेव सानप यांनी केली आहे.