पाटोदा दि.०४:नानासाहेब डिडुळ― दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याने एकीकडे कोरोनाची भीती कमी होत असताना पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी या ठिकाणी एक अत्यंत खळबळजनक घटना घडली असून येथील एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीने कोणतेही कारण नसताना अथवा कसलेही आजारी नसताना केवळ कोरोनाच्या अनामिक भीतीने घाबरून जाऊन गळफास लावून आपले जीवनच संपल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आसाराम रामकीसन पोटे वय ६५ वर्षे असे या मयत व्यक्तीचे नाव असून ही वृद्ध व्यक्ती कसल्याही प्रकारची आजारी नव्हती तसेच त्यांनी गेल्या काही दिवसात कोठेही प्रवास केलेला नव्हता किंवा ते कुना नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आलेले नव्हते केवळ कोरोना विषयी बाहेर चर्चा ऐकून व सद्य परिस्थिती पाहून त्यांनी गुरुवारी सकाळी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपली जीवनयात्रा संपवली व त्यापूर्वी त्यानि लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना त्यांच्या खिशात सापडली असून त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की ‘ मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे यामध्ये कोणाचाही दोष नाही’ त्यामुळे केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे या सर्व प्रकारामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या घटने विषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक कृष्णा डोके हे करत आहेत.
घडलेली घटना ही नक्कीच धक्कादायक आहे कोरोना या आजाराला न घाबरता केवळ स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे जरी एखादया व्यक्तीला हा आजार झाला तरी तो व्यक्ती ठणठणीत बरा होऊ शकतो हे मागील काही दिवसापूर्वी बरे झालेल्या रुग्णांवरून स्पष्ट झाले आहे तरी नागरिकांनी कोरोनविषयी कसलीही भीती न बाळगता निर्धास्त राहावे परंतु स्वतःची काळजी घ्यावी
―डॉ. लक्ष्मीकांत तांदळे
तालुका आरोग्य अधिकारी