बीड:आठवडा विशेष टीम―पंकजाताई मुंढे यांनी वीरपत्नीचे घरी जाऊन सांत्वन केलेल्या शहिद स्मारकाचा निधी हडपण्याचा भाजपा नेत्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला , वीरपत्नीने मुलाबाळासह ग्रामस्थासमवेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन केले होते : डॉ.गणेश ढवळे
Salute to martyr Shivaji Rangnath Shinde from Limbaganesh, Dist. Beed. Met his family n offered my condolences pic.twitter.com/wtZQBAcag0
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2014
लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठी आर.ओ.यंत्रासह जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर निधी ३ वर्षा पूर्वी उचलण्यात आला.काम केलेच नाही, त्यानंतर दि. १६/०२/२०१८ रोजी पाणी आर.ओ.यंत्र म्हणजे शूद्धिकरण यंत्र बसवण्यासाठी २ लाख ९८ हजार रू निधी १४ वर्मा वित्त आयोगाच्या निधीतून उचलण्यात आला. त्यानंतर पुन्हा सन २०२०-२१ मध्ये शहिद सुभेदार शिवाजी शिंदे स्मारकासाठी आलेला निधी २ लाख ५० हजार रुपये हडप करण्यासाठी मा. दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (पंचायत समिती) बीड यांना दि. १५/०८/२०१९ रोजी ग्रामसभा ठराव क्र. १२ दाखवुन ग्रामसभेने निवडलेले शहीद सुभेदार शिवाजी शिंदे यांचे स्मारक उभारणे निधी २ लाख ५० हजार रुपये रद्द करण्यात यावा व तो निधी आर.ओ.यंत्र (तिस-यांदा) बसवण्यासाठी खर्च करण्यात यावा अशी शिफारस करत परवानगी मिळवली संदर्भ: दि. २२/०४/२०२० रोजीचे जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभाग जावक क्रमांक क्र.साप्रवि/पंचायत ४/कावि-४१३/२०२०
वीरपत्नी साधना शिवाजी शिंदे, मुलगा कार्तिक व मुलगी शितल शिंदे–
दि. १७ /०९/२०१५ रोजी डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आप्तकुटुंबिय व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर शहीद स्मारकासाठी निधी मंजूर करून द्यावा यासाठी ग्रामस्थ विक्रांत वाणी, मयुर वाणी, अभिजित गायकवाड, अशोक वाणी, दिपक ढवळे, अमोल जाधव, चंद्रकांत शिंदे, रमेश शिंदे यांच्यासह धरणे आंदोलन केल्यानंतर तत्कालिन ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री बीड पंकजाताई मुंडे यांनी निधि मंजूर केला होता.पंकजाताई मुंडे आमचे सात्वनासाठी घरी आल्या होत्या.आता मंजुर झालेला स्मारकाचा निधी ईतरत्र वळवला असे कळाल्यानंतर पुन्हा एकदा मुलगा कार्तिक व मुलगी शितल आणि ग्रामस्थासह डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊन संपल्यानंतर आमची आंदोलनाची तयारी आहे.
लिंबागणेशच्या सरपंचांनी किती ग्रामसभा घेतल्या―डॉ गणेश ढवळे
लिंबागणेश ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी साडेतीन वर्षात क्वचितच एखाद दुसरी ग्रामसभा घेतली असेल, संपुर्ण कारभार त्यांचे पतीच पाहतात. शहिद स्मारकाचा निधी वळवण्याची कोणतीही ग्रामसभा मुळात झालेलीच नाही,ग्रामस्थांच्या मते एकही ग्रामसभा प्रत्यक्षात कोरम पुर्ण करुन झालेली नाही, झेंडावंदन करण्यापूर्वी घेतलेल्या सह्यांचा आधार दाखवुन ग्रामसभा घेण्यात आली असे दाखवून शासनाची दिशाभूल केली जाते.
आर.ओ.यंत्र (जलशुद्धीकरण यंत्र )साठी तिनदा निधी कसा..?
जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर निधी मध्ये आर.ओ.यंत्र बसवण्यासाठी निधी मंजूर केला आहे.तसेच दि.१६/०२/२०१८ मधेही आर.ओ.यंत्र म्हणजेच पाणी शुद्धीकरण यंत्र २ लाख ९८ हजार रुपये निधी १४ वर्मा वित्त आयोगाच्या निधीतून खर्च दाखवला आहे.त्यानंतर पुन्हा शहिद सुभेदार शिवाजी शिंदे यांना मंजूर करण्यात आलेला शहिद स्मारक निधी २ लाख ५० हजार रुपये स्मारकाचे काम ग्रामस्थांनी ग्रामसभेत रद्दबातल करण्याचा ठराव घेतल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल करून निधी हडपण्याचा सरपंचाचा डाव होता का?? एकाच कामासाठी ३ वेळा निधी देता येतो का ??? हा ग्रामस्थांचा प्रश्न आहे.या प्रकरणी ग्रामस्थांनी तिव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
तसेच १६/०२/२०१८ रोजी पाणीपुरवठा नविन पाईप लाईन २ लाख ९९ हजार रुपये , आणि पाणी पुरवठा देखभाल, दुरुस्ती, हातपंप वर्गणी, विद्युत देयक म्हणुन १ लाख ८३ हजार रुपये खर्च कागदोपत्री दाखवून उचलला आहे.
डॉ.गणेश ढवळें वर ३५३ गुन्हा दाखल करण्याचा असफल प्रयत्न, म्हणून लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांची वरिष्ठांकडे खोटी तक्रार
शहिद सुभेदार शिवाजी शिंदे स्मारक निधी व जलशुद्धीकरण अपर्ण प्रकल्प भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार मी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना केल्यानंतर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या रूमचे कुलुप तोडले व नासधुस केली अंतर्गत ३५३ चा गुन्हा दाखल करण्यात यावा असे षडयंत्र ग्रांमपंचायतने रचले व खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लिंबागणेश पोलिस चौकीतील कर्मचारी यांनी पुराव्या अभावी गुन्हा दाखल करता येणार नाही असे ठामपणे सांगितल्यानंतर सुडबुद्धीने लिंबागणेश पोलिस कर्मचारी यांच्यावर धादांत खोटे आरोप लाऊन वरिष्ठ अधिकारी नेकनुर पोलिस ठाणे येथे बोगस सह्या घेऊन लेखी तक्रार दाखल करण्यात आली.―डॉ गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते ,लिंबागणेश