बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

ना. पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागली नवचेतना

'इन्साफ की डगर से, बच्चों दिखाओ चल के' म्हणत आजच्या नेत्याने साधला उद्याच्या नेत्यांशी संवाद

लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या स्पर्धा परिक्षांना मोठा प्रतिसाद

परळी दि. १०: 'इन्साफ की डगर से, बच्चों दिखाओ चल के' म्हणत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मी आजची नेता असले तरी उद्याचे नेते तुम्ही आहात, असे म्हणत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना जागवली. निमित्त होते
लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे अकॅडमी आयोजित टॅलेंट हंट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे....

जवाहर शिक्षण संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अकॅडमीच्या वतीने आज शहरातील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमातील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी टॅलेंट हंट स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन तोतला मैदानावर करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी मनमोकळा त्यांनी संवाद साधला. व्यासपीठावर त्यांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी हर्षोल्हास व जल्लोषात त्यांचे स्वागत केले.

अन, पंकजाताईंनी जिंकली विद्यार्थ्यांची मनं..

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्कार सोहळा झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह पाहून ना.पंकजाताई यांनी थेट माईक हातात घेतला, त्या म्हणाल्या, मी तुमच्या समोर भाषण करणार नाही तर तुमच्यासाठी एक प्रेरणादायी गीत म्हणण्याची माझी इच्छा आहे. यावेळी ' इंसाफ की डगर पे, बच्चो दिखाओ चल के ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के' हे गीत सुमधुर आवाजात गायिले. उपस्थित विद्यार्थ्यांनी देखील त्यांना तितक्याच लयबद्ध तालीत प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना ना .पंकजाताई म्हणाल्या तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम कराल त्या त्या क्षेत्राचे नेतृत्व कराल आणि परळीचे नाव उज्ज्वल कराल हा विश्वास मला आहे. यावेळी त्यांनी मुलांकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार कोण आहेत? बीडची रेल्वे कोणी आणली? ही सामान्य ज्ञानाची प्रश्ने विचारली तेव्हा विद्यार्थ्यांनी त्याची अचूक उत्तरे मोठ्या आवाजात दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.प्रितमताई मुंडे या होत्या. संस्थेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, फुलचंदराव कराड,जेष्ठ नेते दताप्पा इटके , विकासराव डुबे, गयाताई कराड, डॉ. हरिशचंद्र वंगे , डॉ. दे.घ. मुंडे, प्राचार्य आर. के. इप्पर, विजय वाकेकर आदींसह विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.