” वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन महत्वाचे आहे “
पाटोदा:दत्ता हुले―आज वटपौर्णिमा हा महिलांच्या पती पवित्र्याचा सण म्हणून सर्वत्र साजरा करतात,या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात,सात जन्माचे प्रतीक म्हणून सुताचे सात धागे वडाभोवती गुंडाळून सात जन्मी हाच पती मिळो म्हणून अशी प्रार्थना करतात,आपल्या पूर्वजांनी मानवी आयुष्यतले निसर्गाचे महत्त्व ओळखून निसर्गाची पूजा सूरु केली.ज्या पंचमहाभूतामुळे पृथ्वीवर सजीवसृष्ठी जन्माला आली, वाढली त्याचप्रमाणे निसर्गातील सर्व सजीव-निर्जीव सृष्टीची मानवाला आवश्यकता आहे. त्यातील एक वृक्ष आहे.यामध्ये अनेक प्रकारच्या वृक्षांचा,झाडांचा वेलींचा समावेश होतो.परंतु या सर्वांपेक्षा महत्वाचे काम वनस्पती करतात, ते म्हणजे हवा शुद्धीकरण , निसर्गाच्या सानिध्यातील वड हा मोठा वृक्ष व त्याचे कामही तितकेच मोठे आहे,अगदी प्राचीन काळापासून हा वृक्ष मानवाला शुद्ध हवा, सावली,फळे, लाकडं (इंधन) व औषध देण्याचं काम करत आहे, याच झाडाची एक पौराणीक कथा सांगितली जाते.सत्यवान सावित्रीची,सत्यवान एक राजकुमार व सावित्री एक राजकन्या,वडिलांचे राज्य गेल्याने या तिघांना जंगलात राहावे लागते,सत्यवान लाकडे गोळा करताना झाडावरून पडून मरण पावतो, यमदेव प्राण घेऊन निघतो व सावित्री त्याच्या मागे धावते,ती यमदेवाकडे अनेक विनवण्या करते व शेवटी वडाच्या झाडाखाली सत्यवान शुद्धीवर येऊन जिवंत होतो, ही झाली काल्पनिक कथा पण याच कथेला आपण जर वैद्यकीय व आयुर्वेदिक नजरेने पाहिले तर सत्यवान झाडावरून पडल्यामुळे त्याचा श्वास थांबलेला असतो व वडाच्या झाडाखाली आल्यानंतर त्याला जास्त प्रमाणात व शुद्ध हवा (ऑक्सिजन) मिळतो त्यामुळे सावित्रीचा पती सत्यवान जिवंत होतो व सावित्री तेव्हापासून वडाच्या झाडाची पूजा करते व प्रार्थना करते.
आज आपण पाहिले तर ग्रामीण भागातील महिला याच पौराणिक कथेला आपलंसं करत गावातील वडाच्या झाडाला दोऱ्याचे (सुताचे) सात वेढे घेतात,अगरबत्ती लावतात, दिवा लावतात असे गावातील सर्व महिलांनी वेढे घेतल्याने वडाच्या खोडाला भला मोठा वेढा पडतो, यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, त्या दोऱ्यामध्ये अडकून पक्षाचा, सरपटणाऱ्या प्राण्यांचा,व लाहान कीटकांचा नाहक जीव जातो, काही झाडांचा बुंदा मोठा होण्यासाठी अडचण होते व कालांतराने त्या झाडाला मानवाने फाशी दिल्यागत चित्र दिसते.
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाटोदा तालुक्यातील ढाळेवाडी गावामध्ये खुप वर्षांपासून असलेले वडाचे मोठे व जुनाट झाड आहे, नेहमीच वटपौर्णिमेला या झाडाला गावातील महिला वेढे घालत असतात, यावर्षीही महिलांनी झाडाला वेढे घातले होते,हे लक्षात घेऊन गावातील युवक इंजि,दत्ता हुले व विठ्ठल तनपुरे व मित्र परिवार यांनी हे पहिले व काही वेळात वडाच्या झाडाची तात्काळ सुटका केली व सर्व नवे जुने दोऱ्याचे वेढे कापून काढले.
ढाळेवाडी गावातील युवकांनी हे सर्व करत असतानाच आज वटपौर्णिमा व जागतिक पर्यावरण दिन एकाच दिवशी आला आहे म्हणून एक संकल्प केला व एक वडाचे झाड महिलांच्या वेढ्यातून मुक्त केले व दुसऱ्या ठिकाणी याच वडाची फांदी घेऊन दुसऱ्या ठिकाणी आपल्या शेतात कडुलिंबाचे लाऊन आज अंधश्रद्धेला न जुमानता वृक्षसंवर्धन व वृक्षारोपण या दुहेरी संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.!
“पुनर्जन्म आहे की नाही हे कुणी पाहिले नाही,पण दरवर्षी वडाच्या झाडाला वेढे घालण्यापेक्षा जर एक झाड लावले तर आपल्या अनेक पिढ्या या झाडाच्या सावलीत बसतील, औषधे, फळे, फुले, यांचा स्वाद घेतील. ”
―(इंजि.दत्ता बळीराम हुले)
सामाजिक कार्यकर्ते