सोयगाव दि.०५:आठवडा विशेष टीम―
सोयगाव तालुक्यासाठी रासायनिक खतांचे आवंटन जाहीर झाले असून रासायनिक खतांच्या युरिया खते औरंगाबादवरून सोयगावला पोहच करता येत नसल्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रॅकची सोयगावला जोडणी करण्यात आली आहे.युरियाचे सोयगावसाठी ५५४० मेट्रिक टन आवंटन देण्यात आले आहे.मात्र जळगाव विभागाकडून या आवंटन मध्ये कपात करण्यात येते त्यामुळे सोयगाव तालुक्यात युरियाची टंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाचोरा रॅकमधून दिलेली आवंटन मधून पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना युरियाची मागील खरिपाच्या हंगामात युरियासाठी भातामंती करावी लागली होती.
सोयगाव तालुक्यासाठी सर्वच रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.सर्व खते मिळून यंदाच्या खरीपात १३,४८० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यता आले आहे.मात्र पाचोरा रॅकमधून मंजूर झालेल्या आवंटन मध्येही कपात करण्यात येते त्यामुळे सोयगावला रासायनिक खतांची मोठी टंचाई भासते,मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सोयगाव साठी मंजूर करून दिलेल्या आवंटनच्या प्रमाणात पाचोरा रॅकमधून पुरवठा करण्यात येत नसल्याच्या तक्रारी खरीप हंगामाच्या आधीच शेतकऱ्यांनी केल्या आहे.औरंगाबाद वरून सोयगावचे अंतर १२५ कि.मी आहे त्यामुळे शासनाला थेट सोयगावला खते पुरवठा करणे शक्य होत नसल्याच्या कारणावरून पाचोरा रॅकमधून सोयगावसाठी रासायनिक खते उपलब्ध करण्यात आली आहे.
मंजूर करण्यात आलेले खतांच आवंटन-
युरिया-५५४० मेट्रिक टन
डीएपी-११४० मेट्रिक टन
एस.एस.पी-२२४० मेट्रिक टन
एम.ओ.पी-५१०
एन.पी.के-३८०० मेट्रिक टन