सोयगाव,दि.५:आठवडा विशेष टीम―
घोसला ता.सोयगाव शिवारात दावणीला बांधलेल्या तीन वर्षीय म्हशीवर हल्ला चढविण्याच्या प्रयत्नात म्हशीनेच बिबट्याशी दोन हात करून पाळीव जनावरांची धमक बिबट्याला दाखवून दिल्याने या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.या बिबट्या आणि म्हशीच्या झुंजीत म्हैस मात्र गंभीर जखमी झाली असून अखेरीस बिबट्या आणि म्हशीच्या झुंजीत दावणीचा दोर तुटल्याने म्हशीने बिबट्याच्या कचाट्यातून सुटका करून धावत सुटली होती.
घोसला शिवारात सोपान(दादा)गव्हांडे यांच्या गट क्र-२१२ मध्ये दावणीला म्हैस बांधलेली असतांना डोंगराच्या भागातून म्हशीला एकटी पाहून बिबट्या शेतात अवतरला या बिबट्याने म्हशीवर हल्ला चढविला असता,दावणीला बांधलेल्या म्हशीने बिबट्याशी चार हात करून झुंज केली,शेतातील मजुरांनी हि झुंज डोळ्यांनी पाहून बिबट्या आणि म्हशीचा संघर्ष पाहून मात्र मजुरांनी भीतीपोटी घराकडे पळ काढला होता.अखेरीस संघर्षात गंभीर झालेल्या म्हशीचे दोर तुटल्याने गंभीर जखमी झालेल्या म्हशीने शिताफीने बिबट्याच्या तावडीतून सुटका करून तुटलेल्या दावणीमुळे गावाकडे पळ काढला तरीही चवताळलेल्या बिबट्याने म्हशीचा पाठलाग केला होता.बिबट्याच्या डरकाळ्याच्या आवाजाने काही ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले असता बिबट्याने पुन्हा डोंगराकडे पळ काढला होता,वनविभागाने घटनेचा पंचनामा करून घटनास्थळावरून पगमार्ग तपासणीसाठी घेतले आहे.
चवताळलेल्या बिबट्या शिकारीसाठी आला परंतु शिकार सुद्धा सावध झालेली असल्याने म्हशीने मात्र बिबट्याच्या हल्ल्याला आवाहन देत चार हात करून बिबट्याच्या तावडीतून जीव वाचविला आहे.