पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

चक्रीवादळाने पाटोदा मध्ये घराचे पत्रे व भिंत कोसळल्याने संसार उघड्यावर

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― पाटोदा शहरातील जयसिंग नगर भागातील कौशल्या मारुती शिंदे यांच्या घरावरील पत्रे व भिंत कोसळल्याने त्यांचा संसार उघड्यावर आल्याने अगोदरच कोरोणामुळे रोजगार नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मदतीची मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजता ही घटना घडली असून जीवित हानी झाली नाही ,घरातील सर्व बाहेर होते त्यामुळे सर्वजण वाचले आहेत परंतु घराचे जवळपास ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असून समाजातील दानशूर लोकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन माणुसकीची भिंत पाटोदा , समाजसेवक सुरेंद्र तिपटे , प्रा. लक्ष्‍मण वाघमारे, अंगत सांगळे, आबा नारायणकर यांनी आवाहन केले असून त्यांना युवा नेते सय्यद शहनवाज यांनी ३ हजार रुपयांची मदत दिली आहे व मदतीचा ओघ सुरू आहे. मदतीसाठी किरण मारुती शिंदे फोन पे संपर्क क्रमांक ९१३०२५२७९८ मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.