कोरोना विषाणू - Covid 19परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

कैलास तांदळे यांना कोरोना योध्दा म्हणून सन्मानित

परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता आपले योगदान दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजासाठी व आरोग्यासाठी नागरिकांच्या. सुरक्षेसाठी आहोरात्र केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांचा राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथी व गती मल्टीसव्हीर्ससच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले. कैलास तांदळे यांच्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात लागू असलेले लॉक डाऊन आणि संचारबंदीमुळे नागरिकांना घराबाहेर पडणं धोक्याचे बनलं आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र- राज्य शासनासह डॉक्टर्स, महसूल, ग्रामविकास, पोलीस, पत्रकार , फार्मसिस्ट व सफाई कामगार दिवस-रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणु रोखण्यासाठी परळी तालुक्यात होऊ नये म्हणून ना.धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठान व वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहुल घुले यांच्या मार्फत परळी मतदारसंघात घरोघरी थर्मल टेस्टिंग आरोग्य तपासणी करतांना या सर्व टीमला फार्मसी कैलास तांदळे यांनी मोलाचे सहकार्य कार्य करून कोवीड योध्दा म्हणून आपले योगदान देत आपले कर्तव्य बजावले होते. त्यांच्या या कार्याचे.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी ही कौतुक केले आहे. फार्मासिस्ट कैलास तांदळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात केलेल्या कार्याची दखल घेऊन राधा मोहन प्रतिष्ठान, दै.मराठवाडा साथीचे संपादक चंदुलाल बियाणी व गती मल्टीसव्हीर्ससचे संचालक सचिन भांडे यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करून सन्मानित केले आहे. यावेळी नाथ प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शंकर कापसे, सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे उपस्थित होते. कोरोना योध्दा म्हणून कैलास तांदळे यांचा सन्मान झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.