वर्धा (आ.वि.प्रतिनिधी) दि.१० : मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नाने अपंगांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 36 शासन निर्णय काढून घेतले, तरीही अपंगांच्या समस्या मार्गी लागत नसल्याकारणाने विविध प्रकारचे आंदोलन महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी केले परंतु अपंगांच्या समस्या निकाली काढण्याकरिता प्रशासकीय स्तरावर विविध प्रकारे पाठपुरावा व आंदोलन करीत असते परंतु लोकप्रतिनिधिंनि या सर्व योजना दिव्यांगांपर्यंत कशाप्रकारे पोहोचेल याकडे मा.आ.बच्चूभाऊ कडू यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधीने लक्ष न घातल्याने दिव्यांगांना योजनेपासून वंचित राहावे लागते या कारणाने दिव्यांगांचा हक्काचा माणूस म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधिंनि सुद्धा लक्ष घालावे व योजनांचा लाभ मिळवून द्यावा.
जर स्थानिक लोकप्रतिनिधिंनि अशा गंभीर विषयावर दुर्लक्ष केले तर येत्या काळात संघटना त्यांना त्यांच्याच घरात जेरबंद करून ठेवेल अशा आशयाचे निवेदन देण्याकरिता २०० कार्यकर्त्यांसह
प्रहार अपंग क्रांती आंदोलन वर्धा जिल्हा यांचे पदाधिकाऱ्यांनी मा.आ.पंकजभाऊ भोयर,विधानसभा सदस्य वर्धा-सेलू यांची भेट घेतली.
मा.आ.पंकजभाऊ भोयर यांच्याशी खालील मुद्यावर चर्चा करण्यात आली
१. दिव्यांगांच्या रोजगार संदर्भात खाजगी क्षेत्रात ५% आरक्षण मिळण्याबाबत.
२. संपूर्ण शासकीय कार्यालयात रोजगारासाठी जागा मिळण्यासाठी तसेच शासकीय कार्यालयातील झेरॉक्स सेंटर, उपहार गृह या ठिकाणी परंपरागत मक्तेदारी मोडून ते दिव्यांगांनाच देण्यात यावे.
३. अपंग कायदा २०१६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
४. दिव्यांगांना घरकुल प्राधान्याने देण्यात यावे.
५. दिव्यांगांचा ५% निधी खर्च न झाल्यास त्या संबंधित अधिकारी यांचा वार्षिक वेतनवाढ रोखण्यात यावी.
६. संजय गांधी निराधार योजनेचे मानधन हे नवीन नियमानुसार देण्यात यावे.
या आंदोलनात प्रहार अपंग क्रांती चे झोटिंग गुरुजी , प्रमोद कुऱ्हाटकर, शैलेश सहारे, सिद्धार्थ उरकुडे, आमोद क्षीरसागर, ज्ञानेश्वर गिरसपुंजे, सुनील मिश्रा. प्रहार जनशक्ती पक्ष चे राजेश सावरकर (विधानसभा प्रमुख पुलगाव देवळी), अजय भोयर जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख, किशोर पुसाम यांच्यासह २०० कार्यकर्ते उपस्थित होते.