कोरोना विषाणू - Covid 19गोंदिया जिल्हाब्रेकिंग न्युज

गोंदिया:आज सहा रुग्ण कोरोनामुक्त; आतापर्यंत 58 जणांची कोरोनावर मात

गोंदिया दि.६:बिंबिसार शहारे―कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जिल्ह्यातील नागरिक सजग होत असून स्वतःची व कुटुंबाची काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले नाही. जिल्ह्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरूच आहे.

आज 6 जून रोजी जिल्ह्यातील सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आतापर्यंत 58 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.आज जे सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे त्यामध्ये गोंदिया तालुका – 2 रुग्ण, सडक/अर्जुनी तालुका – 3 रुग्ण आणि अर्जुनी/मोरगाव तालुका – 1 रुग्णाचा समावेश आहे.कोरोनामुक्त होणारे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने ही जिल्हावासीयांसाठी समाधानाची बाब आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णाची एकूण संख्या 69 इतकी आहे.58 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात आता केवळ 11 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या जिल्ह्यातील 1097 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 69 रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. प्रयोगशाळेकडे आता 42 अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला 10 एप्रिल रोजी, दोन रुग्णांना 28 मे रोजी, 25 रुग्णांना 29 मे रोजी. चार रुग्णांना 30 मे रोजी, 31 मे रोजी 6 रुग्णांना ,1 जून रोजी सहा रुग्णांना, 2 जून रोजी 4 रुग्णांना, 3 जून रोजी 2 रुग्णांना ,5 जून रोजी 2 रुग्ण आणि आज 6 जून रोजी 6 रुग्ण उपचारातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले.जिल्हयात आतापर्यंत एकूण 58 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे .

आतापर्यंत कोरोना बाधित जे रुग्ण जिल्ह्यात आढळुन आले आहे त्यामध्ये 26 मार्च, (1 रुग्ण), 19 मे (2 रुग्ण) ,21 मे (27रुग्ण), 22 मे (10 रुग्ण) , 24 मे (4 रुग्ण), 25 मे ( 4 रुग्ण), 26 मे (1 रुग्ण) , 27 मे (1 रुग्ण), 28 मे (9 रुग्ण), 29 मे ( 3 रुग्ण), 30 मे (4 रुग्ण) ,31 मे (1 रुग्ण), 2 जून (2 रुग्ण ) अशा एकूण 69 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

जिल्ह्यात एकूण 24 क्रियाशील प्रतिबंधित क्षेत्र आहे.यामध्ये *गोंदिया तालुका*- नवरगाव/कला, कटंगी, परसवाडा,चुटीया,रजेगाव व गजानन कॉलोनी व काटी. *सालेकसा तालूका* -धनसुवा व बामणी.
*सडक/अर्जुनी तालुका* तिडका, सालईटोला, रेंगेपार, वडेगाव,पांढरवाणी, गोपालटोली.
*गोरेगाव तालुका* – गणखैरा, गोरेगाव येथील गंगाराम चौक ,आंबेतलाव *तिरोडा तालुका*- तिरोडा. *अर्जुनी/मोरगाव तालुका*– करांडली,अरुणनगर, सिलेझरी ,बरडटोली व अरडतोंडीचा समावेश आहे.
विविध शाळा व संस्थांमध्ये 2124 आणि गृह अलगीकरणात 1879 अशा एकूण 4003 व्यक्ती अलगीकरणामध्ये आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.