बीड जिल्ह्यात आज २ महिला कोरोना पॉझिटिव्ह ; धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील रुग्ण

बीड दि.६:आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातून आज शनिवारी पाठवण्यात आलेल्या ५३ स्वॅबपैकी २ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आणि मुंबई वरून आलेल्या असलेल्या दोघांचा त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ३२ व २५ वर्षे दोन्ही महिला- रा.आंबेवडगाव ता.धारूर – मुंबईहून आलेले अशी आजच्या कोरोनाग्रस्थाची माहीती आहे.

५३ पैकी २ पॉझिटिव्ह तर ४७ निगेटिव्ह आले असून उर्वरित ४ अनिर्णित असल्याचे प्रशासनाने सांगितले. यापूर्वीही आंबेवडगाव येथे १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला होता.सर्वांनी सोशल डिस्टन्स ,साबणाने हात धुणे ,मास्क लावून बाहेर पडणे इत्यादीचे कोरोनापासून बचावासाठी पालन करणे गरजेचे आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.