पाटोदा तालुक्यातील डोमरी गावात तीव्र पाणीटंचाई ,सरपंच व ग्रामसेवक यांच्या विरोधात ग्रामस्थांची लेखी तक्रार― डॉ ढवळे

पाटोदा:नानासाहेब डिडुळ― ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे महिना-महिना येत नाहीत,तर कोरोनाग्रस्त जिल्ह्यातुन आलेले सरपंच नारायण भोंडवे होम क्वारंटाईन न राहता गावभर हिंडतात, ग्रांमस्थांची जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार डोमरी ग्रामस्थांनी दिली आहे.

पाटोदा तालुक्यातील मौजे डोमरी गावांमध्ये तिव्र पाणीटंचाई, सरपंच नारायण भोंडवे व ग्रामसेवक बळीराम उबाळे यांच्या विरोधात ग्रामस्थांची जिल्हाधिकारी, यांना लेखी तक्रार

― डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

सविस्तर वृत्त असे की ,पाटोदा तालुक्यातील मौजे डोमरी गावातील पाणीपुरवठा योजना मोडकळीस आली असुन महिना-महिना पाणी नळाला येत नाही,तर काही भागात पाण्याच्या टाक्या केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत.काही भागातील ग्रांमस्थांना नळजोडणी नसल्यामुळे त्यांना एकाच हातपंपाचा आधार आहे.तर सरपंच आणि ग्रामसेवक कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर गावाकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना केली आहे.

बदामबाई भानुदास जावळे ,महिला ग्रामस्थ―

२ वर्षांपासून पाणी टंचाई वाढली आहे, पाण्यासाठी कोणी दखल घेत नाही, आमच्या घरासमोर नाली खोदली आहे, कधी जर नळाला पाणी आले तर नालीतील पाणी भरावे लागते. एक एक हंडा करीत दिवसभर कामधंदा सोडून पाणी भरणे एवढेच काम शिल्लक राहीलंय. पाणीच भेटत नाही, दर तासाला एखाद दुसरा हंडा भरतोय, म्हणुन रांगा लावून पाणी हापसावे लागते.

सरपंच ,ग्रामसेवकांचा पत्ताच नाही ,बाजीराव शिंदे ग्रामस्थ―

सरपंच नारायण भोंडवे ३ महिन्यांपासून गायब आहेत.सोलापुर जिल्ह्यातील कुरुडवाडी गावात राहतात. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सरपंचाची जबाबदारी आहे गावातील ग्रामसुरक्षा पथक नेमून कोरोना विषाणुच्या संसर्गापासून गावाचे रक्षण करण्याची पण त्यांचाच पत्ता नाही.

ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बळीराम उबाळे हेच महिना-महिना गावात येत नाहीत ,जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रार – बाजीराव शिंदे, धनंजय गोरख, पोपट भुसनर , ग्रामस्थ

डोमरी गावचे ग्रामसेवक बळीराम उबाळे हे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत.मात्र तेच गावात महिना महिना येत नाहीत. त्यांच्या विषयी ग्रांमस्थांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांना केली आहे. तसेच फोनवरून विचारणा केली असता मी तलाठी यांना पदभार दिला आहे.तुम्ही त्यांनाच विचारा असे सांगतात. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या हलगर्जीपणामुळे गावात कोरोना रुग्ण सापडला, त्याला व्यवस्थित क्वारंटाईन करून ठेवले नाही. सरपंच स्वत: पर जिल्ह्यातुन आल्यानंतर होम क्वारंटाईन होण्याऐवजी गावभर हिंडत होते. आणि ग्रामसेवक बळीराम उबाळे हे नुसतेच कागदी घोडे नाचवुन जिल्हाधिकारी यांची दिशाभुल करत आहेत. गावातील पोपट कोल्हे आणि जनार्दन भोंडवे हे गावचा कारभार हाकत असुन कोणी तक्रार केली तर त्याच्या घरी जाऊन दमदाटी केली जाते. याविषयी सरपंच नारायण भोंडवे आणि ग्रामसेवक बळीराम उबाळे यांची ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार केली असुन पोलिस बंदोबस्तात इन कमरा चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.