सोयगाव,दि.६:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
विवाहितेच्या अंगावर डीझेल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना नांदगाव(ता.सोयगाव)येथे घडली.जळीत विवाहितेला जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता,तिचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून विवाहितेच्या पतीविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदगाव ता.सोयगाव येथे(दि.३०मे)पहाटे पाच वाजता पती रोहिदास पवार याने विवाहिता छायाबाई रोहिदास पवार(वय ३५)हिचे अंगावर डीझेल टाकून माचीसच्या काडीने पेटविले होते या घटनेत विवाहिता ८० टक्के भाजली असता तिला तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते,तब्बल या भाजलेल्या विवाहितेने आठवडाभर उपचार घेत असतांना तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी मयत विवाहितेच्या मुलगी दिपाली पवार(वय १६)हिने शनिवारी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास गोविंदा पवार(वय ४०)याचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांचेसह पथकांनी भेट देवून घटनेची माहिती घेतली.या प्रकरणी विवाहितेचा पती रोहिदास पवार अद्याप फरारी आहे.या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,सागर गायकवाड,दिलीप तडवी,संदीप चव्हाण,अविनाश बनसोडे,कविता मिस्तरी,वैशाली सोनवणे,आदि तपास करत आहे.
नांदगाव ता.सोयगाव येथील विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फरारी आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
―सुदर्शन मुंडे
उपविभागीय पोलीस अधिकारी