सोयगाव दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोळा वर्षीय मुलगी घरात सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत असतांना अचानक शेतीच्या कामावरून घरी आलेल्या आईला मृत्यूला सामोरे जावे लागेल असे मनातही नसतांना आई व वडिलांचे किरकोळ कारणावरून भांडण सुरु असतांना घरातीलच डीझेल भरलेल्या बाटलीमधून आईच्या अंगावर डीझेल ओतून काही क्षणात वडिलांनी माचीसची पेटती काडी आई छायाबाईच्या अंगावर भिरकावली अन त्यामध्ये आई ८० टक्के भाजल्याची आपबिती फिर्यादी मुलगी दिपाली पवार यांनी सांगितले.आम्ही चारही भावडांनी आईला डोळ्यांनी मृत्युच्या दारात पहिल्याचा थरकाप उडविणारा प्रसंग रविवारी दिपाली पवारने कथन केला होता.
नांदगाव(ता.सोयगाव)येथे पती पत्नीच्या किरकोळ वादातून थेट पत्नीच्या अंगावर डीझेल फेकून माचीसची काडी भिरकावून पती रोहिदास ओंकार पवार(वय ४०)यांनी हा प्रकार केल्याचा पुनरउच्चार दिपालीने केला आहे.घरात चारही भावंडे लहान बहिण रविता पवार(वय १४)भाऊ देवा पवार आणि शिवा पवार अनुक्रमे वय १२ व १४ असतांना वडिलांनी हा प्रकार केला आईला जळतांना या चारही भावंडांनी उघड्या डोळ्यांनी पहिले या चौघांनी आईला मिठी मारून विझविण्याचा प्रयत्न केला परंतु यश हातात आले नाही यामध्ये चारही भावंडांना आईच्या प्रेमाचे मात्र चटके बसले होते.जळीत आईचा अखेर खासगी रुग्णालयात प्राणज्योत मालवली आणि या चारही भावंडाचा आधारवड हरविला असल्याचे त्यांनी सांगितले.गावात आईच नसल्याने कुणाला आई म्हणावे या भावनेने अखेर या चारही भावंडांनी गाव सोडून मामाच्या गावाला वलवाडी ता.भडगावला स्थलांतर केले आहे.
रोजंदारी करून आलेल्या आईला मात्र मृत्यूने कवटाळले-
नुकत्याच लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या कुटुंबाला धीर मिळावा म्हणून आईने रोजगार मिळावा यासाठी शेतात रोजंदारीच्या कामावर जाण्याचा निर्णय घेतला,परंतु रोजंदारीसाठी गेलेल्या आईवर थेट मृत्यूचा काळ येईल असे वाटलेच नसल्याचे चारही भावंडांनी सांगितले घरात सायंकाळचं स्वयंपाकाची तयारी सुरु असतांनाच अचानक हा प्रकार घडला.
विवाहितेच्या जळीत प्रकरणी आरोपी पतीला एक दिवस पोलीस कोठडी-
नांदगाव ता.सोयगाव येथे विवाहितेच्या अंगावर डीझेल ओतून अंगावर माचीसची काडी फेकून जिवंत जाळल्या प्रकरणी पती रोहिदास ओंकार पवार यास सोयगाव पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर उभे केले असता,त्यास एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ,जमादार संतोष पाईकराव,संदीप चव्हाण,सागर गायकवाड,दिलीप तडवी,अविनाश बनसोडे,कविता मिस्तरी,वैशाली सोनवणे आदी पुढील तपास करत आहे.