गोंदिया:बिंबिसार शहारे―आज दिनांक ७ जून २०२० ला सकाळी ११ वाजता वैनगंगा नदी पात्र कवलेवाडा या ठिकाणी पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले ही रेल्वे कर्मचारी यांची असल्याचे समोर येत आहे. दोन्ही मुलांचे वय २० वर्ष असे आहे.
मृतकात क्षीरसागर व राठोड या आडनावाची मुले आहेत. तर एक तरुण बचावला. काचेवणी येथील रेल्वे कॉलनी मधील रहिवासी असून मृतांमध्ये सोना चल राठोड वय २१ वर्ष उमंग शिरसागर वय १८ वर्ष या दोघांचा मृत्यू झालेला आहे. भरत जांभूळकर व १९ वर्ष हा मुलगा बचावलेला आहे. मृतदेह शवविच्छेदन साठी सामान्य रुग्णालय तिरोडा ठेवण्यात आलेले आहेत. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन डोके वराधा लुटे करीत आहेत.