बीड जिल्हाराजकारण

राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पत्ताच नाही,विद्यमान खा.डॉ.प्रितमताई मुंडेंची बॅटिंग सुरू, झंझावती दौऱ्याला जबरदस्त प्रतिसाद

बीड लोकसभा निवडणुक 2019

अंबाजोगाई : लोकसभा निवडणुक तोंडावर आली असतानाही अद्याप राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पत्ताच लागलेला नाही. गल्ली ते दिल्ली सारी राष्ट्रवादी उमेदवाराच्या शोधात मग्न असुन बळीचा बकरा कोण?याकडेच आता साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान जिल्ह्याच्या विद्यमान खा.डॉ.प्रितमताई मात्र पुन्हा एकदा दिल्लीला जाण्याच्या तयारीला लागल्या असुन कालपासुन त्यांनी जिल्ह्याच्या राजकिय पटलावर बॅटिंगला सुरूवात केली आहे.जनसंपर्क दौऱ्याला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद हेच खऱ्या अर्थाने विजयाचे गुपित असुन आता विरोधकांनीही बिनविरोध निवडुन द्यावे अशीच परिस्थिती दिसुन येत आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका होवु घातल्या आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता कुठल्याही क्षणी जाहिर होवु शकते. देशाच्या राजकारणात भाजप विरूद्ध महागठबंधन अशा प्रकारची राजकिय स्थिती सद्या तरी दिसुन येत आहे.मातब्बर दिग्गजांचा कस लागणार असुन प्रियंका गांधीचं आगमन आणि त्यांच्या विरूद्ध मंत्री स्मृती इराणी अशीही चर्चा सुरू आहे. संपुर्ण देशात एका व्यक्तीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ शोधायला गेलं तर आजही सापडणार नाही. सर्व राज्यात दुरंगी-तिरंगी लढती होतील. मात्र अशा परिस्थितीत बीड लोकसभा मतदारसंघ हाच एकमेव आहे की जिथे विद्यमान खासदार शंभर टक्के सुरक्षित असुन याची खात्री विरोधकांनाही आहे. त्यामुळे उद्याचा खासदार कोण? तर प्रितमताईशिवाय दुसरं नाव कुणाच्याही डोळ्यासमोर नाही. त्यांच्या विजयाचा ग्राफ्स पाहता निवडणुक लढवायलाच कुणीच पुढे येत नाही.ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. गेल्या सहा महिन्यापासुन अनेक प्रयोग दस्तुरखुद्द शरदचंद्रजी पवार यांनी केले. मात्र कुठलाही उमेदवार तयार होत नाही. कारण प्रितमताईच्या विरोधात निवडणुक लढवणं राजकियदृष्ट्या सोपं राहिलं नाही.केवळ औपचारिकता म्हणुन ही निवडणुक आहे याची माहिती विरोधकांनाही लक्षात आली आहे. ज्यांना विधानसभा निवडणुक लढवायची आहे असे पुढारी तर लोकसभेला नको म्हणुनच बसले आहेत.कारण लोकसभा निवडणुक पराभुत झालो की त्याचा मार निश्चित विधानसभेला बसेल अशा राजकिय गणितात कुणीच पुढे येईना. बळीचा बकरा कोण? याची आता चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठी आदेश दिला तर आम्ही लढु अशा प्रकारची भीमगर्जना राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी केली असली तरी दबक्या आवाजात उमेदवारीसाठी कासवाच्या पावलाने मागे-पुढे चलत आहेत. दुसऱ्या बाजुने खा.प्रितमताई यांनी मात्र जिल्ह्याच्या राजकिय पटलावर कालपासुन बॅटिंगला प्रारंभ केला आहे. वडवणी तालुक्यात झालेला झंझावती दौरा आणि आज माजलगाव तालुका कारण या मतदारसंघातुन भाजपाला नेहमीच आघाडी मिळालेली आहे. प्रितमताई सहज दौऱ्यात सामान्य जनतेसोबत संवाद साधतात, त्यांच्या गाठीभेटीची शैली केवळ सकारात्मक आणि विकासकामाची चर्चा एवढीच आहे. ज्यांनी रेल्वेचा प्रश्न मार्गी लावला त्याच खासदारांना पुन्हा दिल्लीला पाठवण्यासाठी जणुकाही मतदार उत्साही झाला आहे. समोर उमेदवार कोण? हा विचार न करता खासदारांनी सुरू केलेली बॅटिंग आघाडीच्या फलंदाजाप्रमाणेच आहे. कदाचित प्रितमताई म्हणजे बीड जिल्ह्याच्या राजकिय पटलावर विराट कोहली या भुमिकेत लोकांना पहायला मिळु लागल्या आहेत.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.