बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यसामाजिक

ओ.बी.सी,बाराबलुतेदार समाजाच्या प्रलंबीत प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर टाहो- उतरेश्वर तडसकर

विविध मागण्या संदर्भात बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार समाजाचे 18 फेब्रुवारी रोजी महाआक्रोश धरणे आंदोलातुन टाहो फोडण्यात येणार आहे

आठवडा विशेष|प्रतिनिधी

बीड : ओबीसी बारा बलुतेदार व आठरा अलुतेदार संघटनांच्यावतीने दि. 18 फेब्रुवारी 2019 रोजी ओबीसींच्या विविध मागण्या संदर्भात महाआक्रोश धरणे आंदोलन मा.जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय बीड या ठिकाणी सकाळी 11 ते सायं. 4 या वेळेत करण्यात येणार आहे. या आंदोलनात बारा बलुतेदार त्यांच्या पारंपारिक व्यवसायासह या आंदोलनात सहभागी होणार आहेत.अशी माहीती कुंभार समाज संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष उतरेश्वर तडसकर यांनी दिली.

ओबीसी महामंडळाचे कर्ज तातडीने माफ करण्यात यावे,ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे,फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, बारा बलुतेदार,आठरा अलुतेदार समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, धनगर, मुस्लिम, लिंगायत यांच्या आरक्षणाचा निर्णय शासनाने तात्काळ घ्यावा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, सन 2011 मध्ये झालेल्या ओबीसी जनगणनेची आकडेवारी त्वरीत जाहीर करण्यात यावी, लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राखीव मतदार संघ, राज्यसभा व विधान परिषदेवर या समाजाला प्रतिनिधीत्व देण्यात यावे, भावसार क्र. 170, रंगारी क्र. 132 व भावसार रंगारी क्र.172 या जाती एकच धरुन शासनाने याची दखल घेऊन जात प्रमाणपत्रासाठी वेगळा जी.आर. न ठेवता यासाठी एकच नवीन जी.आर. तातडीने काढण्यात यावा, ओबीसी व इतर सर्व विद्यार्थ्यांची मागील तीन वर्षाची थकीत शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार समाजातील कारागिरांना दरमहा 2000/- रु निवृत्ती वेतन देण्यात यावे, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार समाजातील संत व महापुरुषांचे राष्ट्रीय स्मारक व त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात मेडीकल, इंजिनिअर व व्यावसायिक शिक्षणात एस.सी., एस.टी. प्रमाण 100 टक्के शुल्क परतावा देण्यात यावा.समाज कल्याण विभागाच्या अभ्यासक्रमाप्रमाणेच विमुक्तजाती,इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग विभागाच्या डी.बी.टी. प्रणालीवर 541 अभ्यासक्रमा ऐवजी 1275 अभ्यासक्रमाचा समावेश करुन त्या प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करावी, उच्च शिक्षणासाठी 20 लाख रुपया पर्यंतचे बिनव्याजी व विना जामीन शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन द्यावे, मंदिराच्या इनामी जमीनी गुरव समाजाला देण्यात याव्यात, मंदिराच्या ट्रस्टमध्ये गुरव समाजाला घेण्यात यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्हा व तालुका स्तरावर शासकीय वसतीगृहे तयार करण्यात यावी, ओबीसी कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार विद्यार्थ्यांना शैक्षणिक उन्नती होण्यासाठी शासकीय सवलती व जिल्हयाच्या ठिकाणी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात यावे, व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ वाटप करावी, बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोफत सुविधा देण्यात याव्यात, बारा बलुतेदार, आठरा अलुतेदार समाजाच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी सारखा कायदा लागु करावा.
या धरणे आंदोलनास ओबीसी, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार समाजातील बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार संघटनेचे तथा भावसार समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रकाशराव कानगांवकर, कुंभार समाज महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन दळे, माळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष किशोर राऊत, धनगर कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंकुश निर्मळ, नाभिक समाजाचे विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे, परिट, धोबी सेवा मंडळाचे राज्य निमंत्रक गणेश जगताप, संत गाडगेबाबा तरुण मंडळाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुधीर जाधव, परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष प्रधान पवार, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गुलाब चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रमेश राऊत, लोणारी समाजाचे जिल्हाध्यक्ष अनिल मुळेकर, मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रफीक बागवान, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमर ढोणे, भावसार समाजाचे गणेश लांडे, कोष्टी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश असलेकर, भोई समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय घेणे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय गुरव, आकाश रायते, साळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजू ताठे, शिवाजी जाधव, भटक्या विमुक्त जमातीचे रमेश कैवाडे, जंगम समाजाचे जिल्हाध्यक्ष उमेश स्वामी, कासार समाजाचे जिल्हाध्यक्ष बाळुसेठ रासने, शेखर जवकर, सुतार समाजाचे जिल्हाध्यक्ष बापु भालेकर, नाभिक समाजाचे युवक जिल्हाध्यक्ष किशोर शिंदे, नाभिक समाजाचे सहसचिव रवि भंडारी, विष्णू सपकाळ, नाभिक समाजाचे जिल्हा सरचिटणीस भागवत बिडवे, अंगद सपकाळ, सिध्देश्वर चव्हाण, सोमेश्वर कानगावकर आदींनी केली आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.