औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव तालुक्यात सेवासंस्थांच्या कर्जमाफीत व्याजाची वसुली ,ऐन खरीपात शेतकरी हतबल

सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून सेवासंस्था सर्रास उर्वरित कालावधीच्या व्याजाच्या रक्कम वसुली करत असल्याने ऐन खरीपात शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.व्याजाची रक्कम भरण्यासाठी शेतकऱ्यांजवळ पैसाच नसल्याने सोयगाव तालुक्यात मोठी तारांबळ उडाली आहे.
सोयगाव तालुक्यात शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी ३६ सेवासंस्थांच्या १२३०५ शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली आहे.सदरील आकडेवारी हि केवळ दुसऱ्या यादीचीच आहे.मात्र या पात्र शेर्ताकार्यांकडून सेवासंस्था १ आक्टोंबर २०१९ ते प्रत्यक्ष खात्यावर लाभाची रक्कम वर्ग झालेल्या दिवसापर्यंतच्या कालावधीचे व्याज वसूल करत आहे.एकीकडे शासनाने व्याजासह कर्जमाफीची घोषणा केलेली असतांना दुसरीकडे मात्र सर्रास सहा महिन्यांचे व्याज वसूल करण्यात येत असल्याने कर्जमाफीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला असून या शेतकऱ्यांनी व्याजाची रक्कम भरल्याशिवाय त्यांना नव्याने कर्ज देण्यास बँका असमर्थता दर्शवित आहे.त्यामुळे नवीन कर्ज मिळत नसल्याने पीककर्ज योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना तेलही गेले अन तूपही गेले अशी अवस्था निर्माण झाली आहे.त्यांना बँका बेबाकी प्रमाणपत्रही देत नसल्याने या योजनेतील पात्र शेतकऱ्यांना आता काठी प्रश्न निर्माण झाला आहे.

बँकेचे थेट व्याज वसूल करण्याचे आदेश-

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या दि.२२ जानेवारीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकांनी थेट सेवासंस्थांना १ आक्टोंबर ते प्रत्यक्ष लाभ मिळाल्याच्या कालावधी पर्यंतचे व्याजाची सक्तीची वसुली करण्याचे पत्रच दिले असल्याचे सेवासंस्थांकडून सांगण्यात येत आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकांनी सेवासंस्थांकडून कर्जमाफी योजनेत पात्र ठरलेल्या शेतकयांच्या संख्येनुसार सेवासंस्थांकडून साडे अकरा टक्के व्याजाची रक्कम वसूल केली असून सेवासंस्था शेतकऱ्यांकडून साडे तेरा टक्के याप्रमाणे व्याजाची रक्कम वसूल करत आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.