आमगाव:बिंबिसार शहारे/राहुल उके― तालुक्यातील चिरचाळबांध गावा जवळील डोंगरगाव येथे नागपूर येथील एस आर पी एफ (पोलीस) गोळीबार प्रशिक्षण आज दुपारी सुरू होते. या मध्ये जवानाना गोळीबार कशापध्दतीने करायचे यासंबधी प्रशिक्षण देण्यात येत होते. या प्रशिक्षणादरम्यान त्या परिसरातील सितेपार या गावातील वर्षा पटले ही महिला गर्भवती असुन स्वतःच्या घरी आगंणात कपडे वाडवित असताना हवेत सुटलेली बंदुकीची गोळी त्या महिलेच्या पायात शिरली तात्काळ त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिच्या उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध परिसरातील डोंगरगाव येथे एस आर पी एफ (पोलीस) गोळीबार चे प्रशिक्षण सत्र मागील ४ दिवसा पासून सुरू आहे. या सरावादरम्यान जवानांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान आज, गोळीबार कशी करायची याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु, अचानक प्रशिक्षणाच्या स्थळापासून दिड ते दोन किमी अंतरावरील सितेपार गावातील आपल्या घरगुती कामात व्यस्त असलेल्या वर्षा सुरेश पटले या महिलेच्या पायाला ती गोळी लागली यामध्ये ती जखमी झाली. सुदैवाने ती गोळी इतर ठिकाणी लागली नाही तर मोठा अनर्थ झाला असता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्या महिलेला उपचारासाठी आमगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले व उपचार करून घरी सोडण्यात आले.
यापुर्वीही डिसेंबर २०१९ मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. हे विशेष तसेच हा असा प्रकार होत असल्याने या प्रशिक्षण केंद्राला इतर ठिकाणी हलविण्यात यावे किंवा गावात आशा प्रकारे घटना होऊ नये यासाठी शासनाने काही तरी सुरक्षेचे उपाय करावे ही मागणी सीतेपार व परिसरातील नागरिकांनी केली आहे.