औरंगाबाद, दि.७:आठवडा विशेष टीम― औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत(दि.७) 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 692 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज (दि.०७ जून) 70 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2020 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भावसिंगपुरा (1), बजाजनगर, वाळूज (1), हिना नगर, रशीदपुरा (1), सातारा परिसर (1), बौद्ध नगर (1), मिल कॉर्नर (11), रोजा बाग (1), देवदूत कॉलनी, बजाज नगर (1), देवानगरी (1), पद्मपुरा (1), एन नऊ,रेणुका माता मंदिर परिसर (1), एन तीन सिडको (1), सिंधी कॉलनी (1), मुजीब कॉलनी रोशन गेट(1), नंदीग्राम कॉलनी, गारखेडा (1), शिवाजी नगर (1), रवींद्र नगर, टिळक नगर जवळ (1), भीमनगर, जवाहर कॉलनी (1), जुना मोंढा (1), शिवशंकर कॉलनी, साई नगर (3), मुकुंदवाडी (1), संत ज्ञानेश्वर नगर, एन –नऊ (1), तक्षशील नगर, मोंढा (3), संभाजी कॉलनी एन सहा (1), चिश्तिया कॉलनी (2), पैठण गेट (2), पुंडलिक नगर, गल्ली नं. नऊ (1), आंबेडकर नगर, गल्ली नं. नऊ (3), ठाकरे नगर (1), आंबेडकर नगर, एन-सात (2), बायजीपुरा (2), जटवाडा रोड (1), जुना मोंढा, भवानी नगर (1), नागसेन कॉलनी, बायजीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), बारी कॉलनी (1), आंबेडकर चौक, पिसादेवी रोड (2), कैलास नगर (1), शहानूर मियाँ दर्गाह परिसर, ज्योती नगर जवळ (1), भीम नगर , भावसिंगपुरा (1), संजय नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), तारांगण, पडेगाव (1), अमोदी हिल, पहाडसिंगपुरा (1), घाटी परिसर (1) आणि देवशी पिंपळगाव, गंगापूर (3), बोरवाडी, खुलताबाद (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 31 महिला आणि 39 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1224 जण कोरोनामुक्त
मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
घाटीत दोन, खासगीत तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद येथे आज (७ जून रोजी) दुपारी दोन वाजता औरंगाबाद शहरातील बारी कॉलनीतील 70 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्ण आणि मुकुंदवाडी रोहिदास नगर येथील 80 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा दुपारी चार वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर खासगी रुग्णालयात सहा जून रोजी अल्तमश कॉलनी, गल्ली क्रमांक आठमधील 70 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्ण , कैलास नगरातील 56 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्ण आणि आज (७ जून रोजी) देवडी बाजार, शाम कॉम्प्लेक्स येथील 60 वर्षीय महिला कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 80, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 23, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 104 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.