गडचिरोली दि.८:आठवडा विशेष टीम― गडचिरोली जिल्हयात २७ मे रोजी मुंबईहून पाच जण आले. त्यातील गडचिरोली शहरातील दोन अहवाल या आगोदर पॉझिटीव्ह आले होते तर तीन निगेटीव्ह आले होते. त्यातील उर्वरीत तिघांचे दुसरे नमुने दि.६ जून रोजी तपासणीसाठी दिले होते. त्यातील एकजणाचा अहवाल (वय वर्ष २५) आज पॉझिटीव्ह आला आहे. पुर्वी पॉझिटीव्ह आलेल्या पती-पत्नीच्या कुटुंबातीलच हा सदस्य असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. सदर व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. संस्थात्मक विलगीकरणातील ५१ पैकी ४७ अहवाल पुन्हा दुस-या फेरीत निगेटीव्ह मिळाले तर एक पॉझिटीव्ह व तीन अजून येणे बाकी आहे.