सालेकसा दि.०८:बिंबिसार शहारे― रात्री घरी उशिरा पोहोचल्याने घरचे रागावले. हा राग मनावर घेऊन तरुणीने विहिरीत उडी घेतली. तिच्या मैत्रिणीनेही घरचे सगळे लोक मलाच दोष देतील, म्हणून विहिरीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सकाळी आठच्या सुमारास सालेकसा पोलिस ठाण्याअंतर्गत ग्राम कवडी येथे.. घडली.रोशनी सुखराम चित्रीव (वय 17) असे मृत मुलीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रोशनी व तिची एक मैत्रीण या दोघीही शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ठाणा येथील तीन मित्रांसोबत बाहेर गेल्या होत्या. रात्री बराच उशीर होऊनही त्या परतल्या नव्हत्या. ही बाब रोशनीच्या लहान भावाला माहीत झाली. त्याने तिला रागावले व ती गोष्ट नागपुर ला राहत असनारेया आई वडीलाला सांगितली. आईवडिलांनी तिला समजावले; परंतु रोशनीने रागाच्या भरात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. इकडे घराजवळ असलेल्या तिच्या मैत्रीनीला. रोशनीने आत्महत्या केल्याचे समजले. ती घाबरली. सगळे लोक मलाच म्हणतील, या कारणाने तिनेसुद्धा शासकीय विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जवळच असलेल्या लोकांनी तिला वाचविले. लगेच सालेकसा पोलिसांना माहिती देण्यात आली. पुढील तपास पुलिस निरीक्षक राजकुमार डुगने यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.