बातम्या
IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics IBPS Clerk Admit Card 2025: PET Call Letter Released at ibps.in, Download Hall Ticket PDF EMRS Recruitment 2025 Notification Released for 7276 Vacancies School Holiday on 25th September 2025 (Thursday) RSMSSB JEN Result 2025 Out, राजस्थान gov in Merit List PDF Download Link Active [rssb.rajasthan.gov.in] Complete in 2.5 Years, Mandatory Publication & AI Usage Disclaimers चौवीस तास जनतेसाठी सदैव तत्पर भाऊसाहेब आण्णा भवर! MPSC गट-क सेवा भरती २०२५: ९३८ पदांसाठी अर्ज करण्याची आज (२७ ऑक्टोबर) शेवटची संधी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठी संधी; ७५६५ पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली Cyclone Montha Weather ‘मोंथा’ चक्रीवादळ तीव्र: आंध्र प्रदेश, ओडिशासाठी ‘रेड अलर्ट’; महाराष्ट्रावरही अवकाळी पावसाचे सावट FMGE October 2026 Exam: Top 300 Must-Know Guess Topics

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात ४६२ सायबर गुन्हे दाखल; २५४ जणांना अटक

मुंबई दि.८:आठवडा विशेष टीम― लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र सायबर’ने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४६२ गुन्हे दाखल झाले असून २५४ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १९२ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १८६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्याप्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २५४ आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .

पुणे शहरामध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीला राजकीय रंग असणाऱ्या आशयाची पोस्ट शेअर केली होती ,त्यामुळे परिसरातील वातावरण बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअपवर तसेच अन्य सोशल मिडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नावे व अन्य माहिती प्रसारित होत आहे . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते की कृपया तुम्हाला अशा आशयाच्या पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये .रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त करा . तुम्ही व्हाट्सअप ऍडमिन किंवा निर्माते (group creator )असाल आणि जर कोणी अशी माहिती पाठवत असेल तर तात्काळ सदर ग्रुप सदस्याची त्या ग्रुपवरून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग ‘only admin ‘ असे करावे . कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *