नागपूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांना ना.रामदास आठवलेंनी दिले निर्देश
मुंबई दि.8:आठवडा विशेष टीम― नागपूरच्या नरखेड मधील पिंपळधरा गावातील यूपीएससी चा विद्यार्थी तरूण कार्यकर्ता अरविंद बनसोड यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी; आरोपींवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई करावी तसेच क्राईम ब्रँच च्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत या गुन्ह्याची सखोल चौकशी करावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी नागपूर चे ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ राकेश ओला यांना केली आहे.
अरविंद बनसोड यांचा संशयास्पद मृत्यू म्हणजे हत्या असल्याचा आरोप होत असून या हत्येचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध ना रामदास आठवले यांनी केला आहे.
आंबेडकरी तरुण अरविंद बनसोड (32 ) यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ना. रामदास आठवले यांनी आज नागपूर ग्रामीण च्या पोलिस अधीक्षकांना दूरध्वनी करून याप्रकरणी लक्ष देऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.
अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणी आरोपींवर ऍ ट्रॉ सिटी ऍक्ट तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी जबाबदार धरून गुन्हा दाखल करावा. त्यांचा अटक पूर्व जमीन रद्द करावा किंवा त्याची मुदत संपताच आरोपींना त्वरीत अटक करावी अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.दिवंगत अरविंद बनसोड यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.