बीड दि.८:आठवडा विशेष टीम― बीड जिल्ह्यातून आज २२ स्वॅब कोविड-१९ RT-PCR चाचणीसाठी पाठवले होते त्यापैकी ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर १५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे व १ जणाचा अहवाल inconclusive आहे.
सदरील सहा कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक धारूर तालुक्यातील आंबेवडगाव येथील आहे त्याचे वय १० वर्ष मुलगा अशी माहिती आहे.व दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण वय १८ स्त्री, गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथील आहे.तीन पॉझिटिव्ह मसरत नगर, बीड (हैदराबादहून आलेले) येथील आहेत. आणि एक जण मातावळी ता.आष्टी वय ३५ पुरूष (मुंबईहून आलेला) येथील आहे. मतावळी येथील रुग्ण मयत झाला आहे.