परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― महाराष्ट्र राज्यात कृषी विभागांतर्गत खते बी बियाणे औषधी राज्य व परराज्यातील मोठ्या प्रमाणात घोटाळा असून महाराष्ट्र शासनाकडून दि 19 जुलै 2019 ला एका निवेदनाद्वारे चौकशी घोटाळ्याची करण्याची मागणी काँग्रेस नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केली आहे. कृषि विभागातील खते बी-बियाणे औषधे बाजारात पेठेत दहा हजार कोटींच्या आसपास उलाढाल होते. शेकडो कंपन्या, डीलर्स, विक्रेत्यांना त्यासाठी कृषि विभागाचे परवाने घ्यावे लागतात. मात्र परवाने वितरण्यात आँनलाईन चा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात कृषि आयुक्तालयाला भेट दिल्याशिवाय परवाना मंजूर केला जात नाही. त्यासाठी आँफलाईन कामकाजाला प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे गुणनियंत्रण विभागाच्या संकेत स्थळात जाणूनबजून घोळ केला जातो. निविष्ठांची गुणवत्ता तपासणी करण्याच्या नावाखाली अहवाल मँनेज करून उद्योजकासमोर भ्रष्टाचार करण्यात येतो. नियमाप्रमाणे कृषि प्रयोगशाळेत काम केले जात नाही. गुणनियंत्रण विभागामध्ये किटकनाशकांची गुणवत्ता तपासणी व परवाना वितरणाच्या नावाखाली भ्रष्टाचार करण्यात येतो. कृषि विभागाअंतर्गत उद्योजकांना निविष्ठां उत्पादन विक्रीचा परवाना गुण नियंत्रण विभागात आँनलाईन आँफलाईन दाखवून भ्रष्टाचार करण्यात येतो. खते, बी-बियाणे, किटकनाशके यांचे नमुने अप्रमाणित दाखवून उद्योजकांना जाळण्यात अडकून भ्रष्टाचार करण्यात येतो. खते, बी-बियाणे, किटकनाशके कंपन्यांना प्रेझेंटेशन नावाखाली धमकावून या उद्योगातील लोकांना हतबल करणे. गुणनियंत्रण विभागातील झालेल्या घोटाळे, भ्रष्टाचाराची लाचलुचपत प्रतिबंध, आथिर्क गुन्हे विभाग, विशेष दक्षता पथकामार्फत चौकशी करा. अशा अनेक विविध मागण्यांचे कृषी विभागात चौकशी संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे निवेदन दिले असून शासनाकडून दि 1 मार्च 2019 व 20 ऑगस्ट 2019 ला आदेशही चौकशी चे कारवाई करण्यासंदर्भात दिलेले आहे परंतु.प्रधान सचिव (कृषी) कृषी विभाग मंत्रालय मुंबई कृषी आयुक्त पुणे यांच्याकडून तात्काळ कारवाई करून घोटाळ्याची चौकशी अहवाल सादर करावा व भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश असतानाही आज तागायत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खते औषधी बोगस बियाणे परराज्यातील विनापरवाना उत्पादक कंपन्या व बोगस बियाणे पुरवणारे विक्रेते यांच्यावर कारवाई केली जात नाही यामुळे शेतकऱ्या खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्नामध्ये अडचणी निर्माण होत आहे एक तर निसर्गाच्या साथ नाही शेतीमालाला भाव नाही सरकारचे सहकार्याचे धोरण नाही अतिवृष्टी दुष्काळ रोगराईमुळे शेतकरी हतबल झालेले आहे सर्व चुका शासनाच्या निदर्शनास आणून देऊन कारवाई केली जात नाही असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे शासनाकडून वस्तुस्थिती तपासल्यास महाराष्ट्रात कृषी खात्यात किती मोठा भ्रष्टाचार आहे हे उघडकीस येईल तरी कृषी विभागातील वस्तुस्थिती व मुद्दे निहाय केलेली कार्यवाही शासनाकडे अवगत करावी खते बी-बियाणे औषधी परराज्यातील व बोगस कंपन्यांनी वितरकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेला भ्रष्टाचार उघडकीस आणून तात्काळ कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केलेली आहे.