औरंगाबाद दि.०८:आठवडा विशेष टीम― न्यायाधीन बंदी सचिन भानुदास गायकवाड (रा. मु.पो.बहादरपूर, ता. कंधार, जि.नांदेड) यांच्या मृत्यू चौकशी होणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी औरंगाबाद उपविभागीय अधिकारी यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे अधिकार राहतील. त्यांनी मृत्यूचे कारण, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, दंडाधिकारी यांचा निर्णय, निष्कर्ष या मुद्द्यावर चौकशी करतील, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.