परळी:आठवडा विशेष टीम― कोरोना या आजाराने देशभरात थैमान घातलेले आहे त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कोरोना चा प्रभाव वाढू नये म्हणून मागील 3 महिन्यापासून सर्वत्र लॉक डाऊन केले होते,या मुळे अनेक व्यापारी व्यवसाय बंद असल्याने तसेच अनेकांचे खाजगी नौकऱ्या गेल्या,व्यवसाय बंद पडल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत,याचा विचार करून न प प्रशासनाने या किमान या वर्षाचे नगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांचे भाडे,तसेच नागरिकांच्या घरपट्टी, नळपट्टी माफ करावी असे आवाहन भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.
लॉकडाऊन मुळे गेल्या 3 महिन्यापासून व्यापार बंद असल्याने छोटे-मोठे सगळेच व्यापारी आर्थिक अडचणीत आलेले आहेत,अनेकांनी बँकांचे कर्ज घेऊन व्यापार सुरू केले होते असे व्यापारी या मागच्या 3 महिन्या पासून लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद झाल्याने आर्थिक रित्या प्रचंड अडचणीत आलेले आहेत,यांना थोडीशी आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने त्यांचा विचार करून नगरपालिका प्रशासनाने किमान या वर्षीचे दुकानांचे भाडे,तसेच नागरिकांचे नळपट्टी व घरपट्टी माफ करावी असे आवाहन भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.
0