अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
तालुक्यातील वरवटी येथील गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत शालेय खुल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करून अतिशय चांगला उपक्रम राबविला.
गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळा,वरवटी ता. अंबाजोगाई (जि बीड) यांच्या वतीने दि.16 मे 2020 रोजी खुल्या ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.निबंधाचा विषय-“सेंद्रिय शेती व गाईचे आध्यत्मिक व शास्त्रीय महत्व” हा होता.या स्पर्धेत 38 स्पर्धकांनी आपले निबंध पाठवून सहभाग नोंदविला.विजेत्या स्पर्धकांना रविवार,दिनांक 7 जून रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले.
निबंध स्पर्धेत विजेते स्पर्धक कु.साक्षी बलुतकर,सौ कल्पना कुलकर्णी,रक्षंदा बलुतकर यांना गौरविण्यात आले.परितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम,गो-मातेची प्रतिमा व प्रमाणपत्र असे होते.यावेळी संस्थेचे सचिव सायस मुंडे,बाळासाहेब फड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण केले.या स्पर्धेसाठी अॅड.बाळासाहेब पाटील,गोविंद शेप तसेच परीक्षक म्हणून गोस्वामी सर,शेप,सर व शिरसाठ सर यांनी सहकार्य केले. सुञसंचालन करून अॅड.अशोक मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले.