अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

सरकारने अनुदानास पाञ असलेल्या 165 आश्रमशाळांना 100 टक्के अनुदान द्यावे – लहु बनसोडे

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना लहु बनसोडे यांचे निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
सरकारने 2006 साली मान्यता दिलेल्या 288 आश्रमशाळांपैकी अनुदानास पाञ असलेल्या 165 आश्रमशाळांना तात्काळ 100% अनुदान द्यावे अशी मागणी अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यात अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी सन 2006 साली 288 आश्रमशाळांना कायम विना अनुदान तत्वावर मान्यता देण्यात आली.तेव्हा पासुन या 288 शाळांना एक रूपयांचे ही अनुदान दिलेले नाही.तरी राज्य सरकारने याप्रश्नी गोरगरीब व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना नव्या जगात सन्मानाने जगता येईल या करिता या विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण,सर्व शैक्षणिक सोयी व सुविधा मिळाल्या पाहीजेत यासाठी
288 पैकी अनुदानास पाञ असलेल्या 165 आश्रमशाळांना 100% अनुदान द्यावे अशी मागणी करून अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंञी तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना सोमवार,दिनांक 8 जून रोजी अंबाजोगाई येथे भेटून निवेदन दिले.दिलेल्या निवेदनात लहू बनसोडे यांनी म्हटले आहे की,आम्ही अनेक आंदोलने केल्याने 8 मार्च 2019 रोजी 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय होऊनही आज पर्यंत एक रूपयाचे अनुदान मिळालेले नाही.त्यामुळे संस्थाप्रमुख,शिक्षक,कर्मचारी यांना सतत अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.त्यामध्ये कोरोना (कोवीड-19) या साथरोगाने थैमान घातले.या परिस्थितीत ही आश्रमशाळांचे विद्यार्थी,शिक्षक व कर्मचारी यांच्या जीवनाचा सरकारने
कधीही विचार केलेला नाही.तरी याप्रश्नी राज्य सरकारने 288 पैकी अनुदानास पाञ असलेल्या
165 आश्रमशाळांना आश्रमशाळांना 100% अनुदान द्यावे अशी मागणी करून लहू महादेव बनसोडे यांनी केली आहे.

आश्रमशाळांच्या मागणीला पाठींबा देणारांचे आभार

राज्यातील अनुदानास पाञ असलेल्या आश्रमशाळांना राज्य सरकारने अनुदान द्यावे यासाठी खा.डॉ.अमोल कोल्हे,माजी मंत्री प्रफुल्ल पटेल,शिक्षक आ.विक्रम काळे,आ.रावसाहेब अंतापुरकर,आ.दत्तात्रय सावंत,आ.बळवंत वानखडे, आ.राजेश एकडे,आ.बाबाजानी दुर्राणी,आ.अशोक पवार,आ.निलेश लंके,आ.नागो पुंडलिक गाणार,आ.बाबासाहेब पाटील,आ.श्रीकांत देशपांडे,आ.किशोर दराडे,आ.घनश्याम शेलार या मान्यवरांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या गरीबीची जाण असल्याने राज्य सरकारच्या नांवे वेळोवेळी त्यांनी या 288 पैकी अनुदानास पाञ असलेल्या 165 आश्रमशाळांना दिलेले शिफारस पत्र यांचा तातडीने विचार व त्यांच्या पत्रांचा आदर करून या शाळांना 100 टक्के अनुदान द्यावे.संघटनेकडून या मान्यवरांचे तसेच या विषयावर सातत्याने पाठपुरावा करणा-या सर्व पञकार बांधवांचे जाहीर आभार अनुसूचित जाती आश्रमशाळा अनुदान संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष लहू महादेव बनसोडे यांनी मानले.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.