अर्जुनी मोरगाव:बिंबिसार शहारे― दि. 09-06-2020 अर्जुनी येथील रहिवासी असलेले पुरूषोत्तम तरजुले यांच्या मुलाचे एकाएकी निधन झाले. प्रेत जाळण्यासाठी जलाऊ लाकडं विकत घेण्यासाठी वन विभागाच्या आँफीस मध्ये गेले असता .परंतु त्यांना लाकडं देण्यास नकार दिले. म्हणून आर. के. जांभूळकर अर्जुनी/मोर तालुका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाअध्यक्ष त्रीसरण शहारे यांच्या नेतृत्वात प्रेत यात्रा रेंज आँफीस मध्ये नेऊन गरीब लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्या यात्रेत मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लाडे, अजय बडोले, रूपलाल बनकर, खुमदेव शहारे, हे सर्व उपस्थित होते.