औरंगाबाद जिल्हाकोरोना विषाणू - Covid 19ब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सावरखेडा,फर्दापूर आणि बुलढाण्यातील १४ स्वॅब तपासणीसाठी ,सोयगाव तालुक्याला अहवालाची प्रतीक्षा

जरंडी दि.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सावरखेडा गावात कोरोना संसर्गाची महिला बाधित असल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी तालुका आरोग्य विभागाने महिलेच्या कुटुंबियांसह संपर्कात आलेल्या फर्दापूर आणि बुलढाणा येथील नातेवाईकांना स्वॅब तपासणीसाठी बोलावून घेण्यात आल्याने तीन गावातील १४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे यांनी दिली.
सावरखेडा सकारात्मक आलेल्या महिलेचा फर्दापूर आणि बुलढाणा कनेक्शन उजेडात आल्याने या दोन्ही गावातील सहा आणि महिलेच्या कुटुंबियातील आठ याप्रमाणे १४ स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून अकरा जणांना सोयगावच्या विलीगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.मंगळवारी सावरखेडा गावाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कवडे,उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील,तहसीलदार प्रवीण पांडे,गटविकास अधिकारी सुदर्शन तुपे आदींच्या पथकांनी भेटी देवून ग्रामस्थांना गावातच आरोग्य सेवा पुरविण्याच्या सूचना देवून अत्यावश्यक सुविधा पुरविण्याबाबत सूचना दिल्या,अधिकायांच्या पथकांनी गाव प्रदक्षिणा घालून गावाची माहिती घेवून विषाणूचा प्रादुर्भावाची उगम स्थानाची शोध मोहीम घेण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास सोनवणे यांनी कोविड-१९ बाबत घेतलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.ग्रामसेवक गणेश गवळी यांनी ग्रामपंचायतीमार्फत राबविलेल्या योजना अधिकाऱ्यांना सांगितल्या.

आरोग्य विभागाकडून कुटुंब तपासणी मोहीम-

तालुका आरोग्य विभागाकडून गावातील ५८५ कुटुंबातील १९७७ घरांची आरोग्य तपासणी करून थर्मल गनचं सहाय्याने कोविड-१९ तपासणी मोहीम राबविली.

५५ वर्षावरील ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना-

गावातील ५५ वर्षावरील ग्रामस्थांच्या आरोग्याची देखभाल करण्याची जबाबदारी यंत्रणांनी घेतल्या असून गावातील वृद्ध ग्रामस्थांच्या आरोग्याकडे लक्ष पुरविण्याबाबत तातडीच्या सूचना अतिरक्त मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी दिल्या आहे.

पंचायत समिती,आरोग्याचे पथक गावात तळ ठोकून-

पंचायत समितीचे एक,आरोग्याचे एक आणि महसूलचे एक याप्रमाणे तीन यंत्रणांचे पथके गावात तळ ठोकून आहेत.

अहवालाची प्रतीक्षा-

सावरखेडासह तीन गावातील १४ जणांचे घेण्यात आलेल्या अहवालाची सोयगाव तालुक्याला प्रतीक्षा लागून आहे.एकही संशाय्ती रुग्ण नसलेल्या सोयगाव तालुक्यात कोरोनाचा प्रवेश झालेला असून १४ जणांचे स्वॅब पुन्हा घेण्यात आले असून सोयगाव तालुक्यातील नागरिकांचा जीव मुठीत असल्याची स्थिती तालुक्यात उद्भवली आहे.त्यामुळे या अहवालावर लक्ष लागून आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.