जरंडी,दि.९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
सोयगाव तालुक्यात कोविड-१९ च्या पहिल्या रुग्णाच्या सतर्कतेसाठी प्रशासनाच्या आधीच ग्रामस्थांनी आराखडा बनविला असून गावात नवख्या व्यक्तींना प्रवेश बंदीचा सावरखेडा येथील ग्रामस्थांनी मंगळवारी घेतला असून अक्खे गावच मंगळवारी घरात बसून होते,त्यामुळे ग्रामस्थांनी धीर धरून एका रुग्णाच्या संकटावर मात करण्याचा धाडसी निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामसेवक गणेश गवळी यांनी दिली आहे.
सावरखेडा गावात विना मास्क कोणीही फिरू नये असा अध्यादेशच ग्रामपंचायतीने काढला असल्याने गावातील प्रत्येकाच्या तोंडाला मास्क दिसत असून गावात नवख्या व्यक्तींना प्रवेशबंदीसह गावातून कोणत्याही नागरिकाला गावाबाहेर न जाण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.आधीच्या चार लॉकडाऊनचे कडेकोट नियम पाळलेल्या सावरखेड गावावर हि नौबत आली असून ग्रामस्थांनी मात्र धीर सोडलेला नसून प्रशासनाच्या दिमतीला ग्रामस्थांनीही खांद्याला खांदा लावून संघर्ष करत आहे.
लहान बालकांनाही मास्कशिवाय अंगणात खेळण्याची मुभा-
ग्रामपंचायतीच्या वतीने सावरखेडा गावात अंगणात खेळणाऱ्या बालकांना मास्क लावण्याची मोहीम ग्रामसेवक गणेश गवळी यांनी हाती घेतली होती,त्यामुळे बालकांना मास्क शिवाय अंगणात खेळण्याची मुभा नसल्याचे गणेश गवळी यांनी सांगितले.
सकारात्मक रुग्ण आढळताच अक्खे गाव घरातच-
सावरखेडा गावात कोरोनाचा सकारात्मक रुग्ण आढळल्याने मंगळवार पासून गावात अघोषित संचारबंदी लागू झाली असून अक्खे गाव घरातच होते,त्यामुळे ऐन पेरणीच्या काळात सावरखेडा ग्रामस्थांना घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे.