राजकारणलातूर जिल्हा

लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचे आभार मानु नका-राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर

लातूर: निलंगा येथील संगनबसवमठाचे ७५ लाख रुपये किमतीच्या सामाजिक सभागृहाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला.
या सोहल्याचे भूमिपूजन राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या हस्ते ११ फेब्रूवारी २०१९ सोमवारी संपन्न झाला.या सोहल्याच्या अध्यक्ष स्थानी लातुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संभाजिराव पाटील निलंगेकर हे होते.याप्रसंगी बोलतांना राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, लिंगायत समाजासाठी सरकार कडून ज्या योजना मिळत आहेत त्याबद्दल पालकमंत्री निलंगेकर हे केवळ निम्मीत्त मात्र आहेत. त्यामुळे संभाजीराव निलंगेकर यांचें आभार मानण्याची आवश्यकता नाही आभार मानायचेच असतील तर महाराष्ट्र सरकारचे आभार माना असे उपस्थित जनसमुदायाना त्यांनी आव्हान केले.
मंचावर जिल्हा परिषेदअध्यक्ष मिलिंद लातुरे,अहमदपुरचे आमदार विनायकराव पाटील.पं.स सभापती अजित माने, नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांच्यासह लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.