शिक्षकांच्या थकीत वेतनाचा प्रश्न ना. पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नामुळे सुटला- रमेश पोकळे

बीड दि.१३ (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील गत पाच वर्षापासुन बृहत आराखडा व वाढीव पदावर काम करणार्या शिक्षकांचे थकित वेतन अदा करणे बाबत ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नाने थकित वेतनाचा प्रश्न आज निकाली काढण्यात आला. या बाबत बीड जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक मार्च २०१४ पासुन जि.प.शाळेवर काम करत होते. परंतु त्या ठिकाणी काम करणार्या शिक्षकांना संचमान्यता नसल्यामुळे त्यांचे वेतन अदा करण्यात आले नव्हते. या प्रश्नाबाबत ना.पंकजाताई मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून महाराष्ट्र राज्यातुन वेगवेगळ्या जिल्ह्यातील अतिरिक्त असलेली पदे दि. २७ नोव्हेंबर २०१५ ला बीड जिल्ह्याला ७९३ वाढीव पदाला मान्यता दिल्याने त्यांचा नोव्हेंबर २०१५ पासुन चा वेतनाचा प्रश्न मिटला होता. परंतु, मार्च २०१४ पासुन काम केलेल्या शिक्षकांना त्यांचे २० ते २१ महिन्याचे वेतन थकित होते. हा प्रश्न निकाली निघल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नेते रमेश पोकळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
या संदर्भात विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी हा प्रश्न धसास लावण्यासाठी ना.पंकजाताईंकडे वेळोवेळी प्रयत्न केल्यामुळे ना.पंकजाताईंनी शिक्षण संचालक,प्राथमिक पुणे यांच्याकडे पाठपरावा करून पत्र जा.क्र.४५६ आज दि.१२-२-२०१९ रोजी निकाली काढला.
हा थकित वेतनाचा प्रश्न सुटल्यामुळे विविध संघटनामार्फत ना.पंकजाताई मुंडे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत. व थकित वेतनधारक आनंद व्यक्त करत आहेत. या बाबत शिक्षक भारतीचे श्री आगळे सर, आरसुळ सर, फुलझळके सर, मस्के सर, भोसले सर, इमरान मिर्झा, शिक्षक संघाचे श्रीराम गवते, तात्यासाहेब गवेत, बहुजन शिक्षक संघटनेचे प्रकाश गाडे, नामदेव वाघ, कापसे सर, काजळे सर, कोळपे सर, आगाम सर, प्रहार शिक्षक संघटनेचे द.ला.वारे, रोटे सर,कल्याण घोलप व ईतर शिक्षक प्रतिनिधींनी ना.पंकजाताईंचे आभार मानले.