लिंबागणेश दि.१०:आठवडा विशेष टीम― जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील जिल्हारुग्णालयातील आरोग्य विषयक, शिक्षण, महसुल , प्राथमिक आरोग्य केंद्र, रिक्त पदे तसेच ग्रामिण भागातील पोलिस चौकी, पशूवैद्यकिय दवाखाना, पिण्याचे पाणी , शौचालय आदि. असुविधा वारंवार बीड जिल्ह्यातील दैनिकांनी प्रसिद्ध करून सुद्धा दुर्लक्ष करणा-या जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी व रिक्त पदे तात्काळ भरण्याची दृष्टी भालचंद्र गणपतीने हरकारला द्यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील रिक्त जागा, जिल्हा रुग्णालयात व केज ग्रामिण रूग्णालयात असणारी असुविधा त्यातुन रुग्णांचे हाल तसेच वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना अपुरी असुविधा या विषयी वारंवार विविध दैनिकातून प्रसिद्धी देऊन सुद्धा दृष्टीहीन सरकारला जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त लिंबागणेश येथिल जागृत देवस्थान भालचंद्र गणपती यांनीच दृष्टीदान करावी ज्यामुळे सरकार तात्काळ रिक्त पदे भरण्यात पुढाकार घेऊन बीड जिल्ह्यातील नागरीकांची गैरसोय दूर होईल यासाठी व वारंवार दैनिकांनी बीड जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी यांची पदभार देण्या बाबतची मनमानी व रुग्णांची असुविधा या विषयी वारंवार प्रसिद्धी माध्यमांनी निदर्शनास आणून देखिल दखल न घेणा-या जिल्हा प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज दि. १० जुन २०२० रोजी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश येथे धरणे आंदोलन करण्यात आले , यासंबंधी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महसुल मंत्री, शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, ग्रामविकास मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन डॉ गणेश ढवळे यांनी ई-मेलद्वारे पाठवले आहे.यावेळी विक्रांत ऊर्फ आप्पा वाणी, दिपक ढवळे , आगवान फौजी , आदि.लिंबागणेशकर हजर होते.