पाटोदा तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीशेतीविषयक

बीड जिल्ह्यात ६३ मंडळापैकी २२ मंडळात कापूस व तूर पिकांना विमा ,बाकीच्या ४१ मंडळात विमाच नाही

पिकविमा कंपन्यांनी शेतक-यांना फसवले, बीड जिल्ह्यातील ६३ मंडळापैकी २२ मंडळ मध्ये कापूस आणि तुर यांना विमा दिला तर ४१ मंडळात पिकविमा मंजुरच नाही, जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधान , मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार―डॉ.गणेश ढवळे ,सामाजिक कार्यकर्ते बीड

लिंबागणेश दि.११:आठवडा विशेष टीम प्रधानमंत्री पिक विमा योजना खरिप हंगाम २०१९ मध्ये बीड जिल्ह्यातील दि. भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात आली, त्यांनी बीड जिल्ह्यातील एकुण ६३ मंडळापैकी केवळ २२ मंडळ शेतक-यांना कापूस आणि तुर पिकविमा मंजूर केला आहे तर चक्क ४१ मंडळ यातुन वगळली आहेत. बालाघाटावरील शेतक-यांचे मुख्य पिक कापूस आणि तुर असल्यामुळे आणि त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याची आशा बाळगणा-या शेतक-यांमधे विमा कंपनीने फसवणुक केली असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पिकविमा कंपन्यांनी फसवल्याची पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री, सामाजिक न्याय तथा पालकमंत्री बीड यांना तक्रार― डॉ.गणेश ढवळे

बीड तालुक्यातील राजुरी नवगण , लिंबागणेश,नाळवंडी,पाली , बीड,चौसाळा, म्हाळसजवळा ,मांजरसुंभा, नेकनुर पेंडगांव, पिंपळनेर, ,या मंडळातील ,बालाघाटावरील शेतक-यांचे कापूस आणि तूर हेंच दोन नगदी पिके घेत असुन त्यातूनच पाळी, पेरणी ,खत, बि-बियाणे यासाठी त्यांचाच उपयोग होतो.अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस व तुर उत्पादक शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

१४० रु.पिकविमा देऊन क्रुरचेष्टा

काही शेतक-यांना १४० रु इतकी रक्कम पिकविमा कंपन्यांनी देऊन शेतक-यांची क्रुरचेष्टा केली आहे.
त्यातच विमा कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत पंतप्रधान, केंद्रिय कृषीमंत्री, मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी तक्रार ई-मेलद्वारे पाठवली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.