मांजरसुंबा:आठवडा विशेष टीम― राष्ट्रीय महामार्ग ५२ सोलापूर ते धुळे मांजरसुंभा ते नेकनुर दरम्यान निकृष्ट दर्जाचे झाले असुन वर्षभरातच रस्त्याला तडे पडलें आहेत तर गवारी फाट्याजवळ रस्ताकाम अर्धवट सोडून दिले आहे. याप्रकरणी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी तक्रार जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.
रस्ताकाम अर्धवट सोडल्यामुळे नागरीकांना मनस्ताप
मांजरसूंभा ते नेकनूर दरम्यान सिमेंट रस्ता काम दोन वर्षांपासून रखडलेले आहे, गवारी फाट्याजवळ काम अर्धवट सोडून दिलेले आहे, पावसाळ्यात खड्डयात पाणी साचत असुन खराब रस्त्यामुळे नागरीकांना वाहन दुरूस्तीचा खर्च वाढल्याचे तसेच जागोजागी असणा-या खड्ड्यांमुळे मणक्याचे व पाठीचे आजार वाढल्याचा दुचाकी वाहनधारकांची तक्रार आहे. तात्काळ रस्ता पुर्ण करण्यात यावा जेणेकरून नागरीकांचा प्रवास सुखकर व्हावा,मनस्ताप सहन करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
निकृष्ट दर्जाचे काम, नितिनजी गडकरी यांना लेखी तक्रार
मांजरसुंभा ते नेकनुर दरम्यान निकृष्ट दर्जाचे रस्ताकाम झाले असुन वर्षभरातच रस्त्याला भेगा पडल्या आहेत, याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे नितिनजी गडकरी ,केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना केली आहे.