मांजरसुंबा (बीड):आठवडा विशेष टीम― सोलापूर ते धुळे या राष्ट्रीय महामार्ग वरील मांजरसुंभा घाटामध्ये पोईचा देव फाटा ते कोळवाडी या एक ते दिड किलोमीटर अंतरावरील घाटामध्ये पथदिवे लावलेलेच नसल्यामुळे अंधारात लुटमारीचे प्रकार व पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या संभाव्य शक्यतेमुळे तात्काळ पथदीवे बसवण्यात यावेत अशी मागणी डॉ.गणेश ढवळे यांनी लेखी निवेदन ई-मेलद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिनजी गडकरी यांना दिले आहे.
मांजरसुंबा घाटात लुटमार
यापुर्वीही नेकनुर पोलिस ठाण्यात मांजरसुंभा घाटात ट्रकमधुन सामान चोरी जाणे ,अथवा वाहने अडवून लुटमार करणे अशा घटना घडलेल्या आहेत.
पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे होणारे अपघात
मोठमोठाले डोंगर कोरून नविन रस्तामार्ग बनवल्यामुळे व सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामूळे त्या ठिकाणी लोखंडी जाळीची संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर रात्रि अपरात्री दरड कोसळली तर पथदिव्यांच्या प्रकाशात दिसून येईल.
नितिनजी गडकरी , केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री यांना निवेदन
जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत या प्रकरणी नितिनजी गडकरी, केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री , मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, रस्तेविकासमंत्री , सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांना लेखी निवेदन ई-मेलद्वारे पाठवले आहे.